VI Extra Data Plan: कंपनीच्या Affordable रिचार्जमध्ये मिळतोय अतिरिक्त डेटा, जाणून घ्या किंमत आणि Best बेनिफिट्स

Updated on 04-Mar-2024
HIGHLIGHTS

Vodafone Idea स्वस्त प्लॅनसह नवी ऑफर जाहीर केली आहे.

Vodafone Idea ची नवी ऑफर 75 रुपयांच्या प्लॅनसह मिळत आहे.

ऑफर अंतर्गत प्लॅनमध्ये 1.5GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे.

Vodafone Idea ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी VI अनेक उत्तम प्लॅन्स ऑफर करते. नव्या ऑफरमध्ये युजर्स त्यांच्या विद्यमान प्लॅन्ससह अतिरिक्त लाभ देऊन देखील संतुष्ट करते. आता कंपनी पुन्हा एकदा अशीच ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत यूजर्सना प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्लॅनची ​​किंमत प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या प्लॅनची किंमत आणि ऑफरमध्ये मिळणारे बेनिफिट्स-

Vodafone Idea ची नवी ऑफर

Vodafone Idea (VI) ची नवी ऑफर 75 रुपयांच्या प्लॅनसह मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आत्तापर्यंत कंपनी या प्लॅनसह 6GB डेटा देत होती. मात्र, नव्या ऑफरअंतर्गत आता कंपनी त्यात 25% अतिरिक्त डेटा देत आहे. आता 75 रुपयांच्या रिचार्जवर तुम्हाला 6GB ऐवजी 7.5GB डेटा मिळेल. मात्र, लक्षात घ्या की, Vodafone Idea च्या या डेटा प्लॅनमध्ये केवळ महाराष्ट्र आणि गोवा या 2 सर्कलमध्ये बदल करण्यात आला आहे.

Vodafone Idea चा 75 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या 75 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये तुम्हाला 7 दिवसांपर्यंत वैधता मिळणार आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये तुम्हाला 7 दिवसांच्या वैधतेसह 6GB डेटा दिला जात होता. मात्र वर सांगितल्याप्रमाणे, ऑफर अंतर्गत 1.5GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. त्यानुसार, तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 7.5GB डेटाचा ऍक्सेस मिळेल. लक्षात घ्या, हा Vodafone Idea चा डेटा प्लॅन आहे. यामध्ये यूजर्सना डेटा व्यतिरिक्त इतर कोणतेही टेलिकॉम फायदे मिळत नाहीत.

Vodafone Idea चा 98 रुपयांचा प्लॅन

बजेटमध्ये कंपनीकडे 98 रुपयांचा प्लॅनदेखील उपलब्ध आहे. हा प्लॅन संपूर्ण ​14 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. केवळ कॉलिंगच नाही तर, VI च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 200MB डेटाची सुविधा देखील देण्यात आली आहे. मात्र, लक्षात ठेवा की या प्लॅनमध्ये तुम्हाला SMS चे फायदे मिळणार नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :