digit zero1 awards

डेली 4GB डेटासह येणारे Vodafone Idea चा Special प्लॅन, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम बेनिफिट्स। Tech News 

डेली 4GB डेटासह येणारे Vodafone Idea चा Special प्लॅन, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम बेनिफिट्स। Tech News 
HIGHLIGHTS

Vodafone Idea चा 4GB दैनिक डेटा प्लॅन 475 रुपयांच्या किमतीत येतो.

या प्लॅनमध्ये हिरो अनलिमिटेड फायदे देखील मिळतात.

Vodafone Idea ने लवकरच 5G कनेक्टिव्हिटी रोलआउट करण्याची योजना

Vodafone Idea भारतातील आघाडीच्या दूरसंचार ऑपरेटरपैकी एक आहे. प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आपल्या प्लॅनमध्ये असे काही बेनिफिट्स ऑफर करते, जे इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी करत नाही. तुम्हाला VI च्या प्लॅन्समध्ये रात्रीसाठी अमर्यादित डेटा आणि विकेंड डेटा रोलओव्हर सारखे फायदे मिळतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला दररोज 4GB डेटासह येणाऱ्या प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात या प्लॅनची सविस्तर माहिती-

जर तुम्हाला दररोज अधिक डेटाची आवश्यकता असेल आणि डेटा व्हाउचरसह रिचार्ज करण्याची गैरसोय नको असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. Vodafone Idea चा 4GB दैनिक डेटा प्लॅन 475 रुपयांच्या किमतीत येतो. तुमच्या गरजांनुसार हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल.

Vodafone Idea 475 recharge plan
Vodafone Idea 475 recharge plan

Vodafone Idea चा 475 रुपयांचा प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea चा 475 रुपयांचा प्लॅन वापरकर्त्यांना दररोज 4GB डेटा ऑफर करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतातील ग्राहकांसाठी हा एकमेव प्लॅन आहे, जो 4GB दैनंदिन डेटासह येतो. FUP डेटा वापरल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन 64 Kbps होतो. मात्र, हा एक महागडा प्लॅन आहे. कारण 475 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ 28 दिवसांची वैधता मिळेल.

बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100SMS सह येतात. या प्लॅनमध्ये हिरो अनलिमिटेड फायदे देखील मिळतात. यामध्ये डेटा डिलाइट्स, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाईट यांचा समावेश आहे. बिंज ऑल नाईटमध्ये तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 वाजतापर्यंत अमर्यादित डेटाचा लाभ मिळेल. तर, विकेंड डेटा रोलओव्हरमध्ये तुम्हाला सोमवार ते शुक्रवारचा उर्वरित डेटा शनिवार आणि रविवारी वापरायला मिळेल.

Vodafone Idea 5G

Vi चे 5G नेटवर्क अजून लॉन्च झालेले नाही. त्यामुळे Airtel आणि Jio ग्राहकांप्रमाणे Vi ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा ऑफर मिळत नाही. मात्र अलीकडेच आलेल्या वृत्तानुसार, Vodafone Idea ने लवकरच 5G कनेक्टिव्हिटी रोलआउट करण्यासाठी योजना देखील आखली आहे. Vodafone Idea (VI) ने सांगितले की, ते पुढील 6 ते 9 महिन्यांत 5G सेवा सुरू करू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo