VI ची मोठी घोषणा! कंपनीने Netflix सह लाँच केले 2 नवीन प्लॅन्स, जाणून घ्या किंमत आणि बेनिफिट्स

Updated on 31-May-2024
HIGHLIGHTS

Vodafone-Ideaने Netflix सोबत पार्टनरशिपची मोठी घोषणा केली आहे.

कंपनीने मोफत Netflix सह दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत.

Vodafone-Idea च्या नव्या प्लॅन्सची किंमत 998 आणि 1399 रुपये इतकी आहे.

Vodafone-Idea VI सतत आपल्या युजर्सना आकर्षक भेटी देत असते. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे Vodafone-Ideaने Netflix सोबत पार्टनरशिपची मोठी घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, या घोषणेसह VI ने दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स देखील लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना टेलिकॉम बेनिफिट्ससोबत फ्री Netflix सब्सक्रिप्शन देखील मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

Also Read: 50MP AI कॅमेरासह लेटेस्ट Lava Yuva 5G भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी। Tech News

Vodafone-Idea च्या नव्या प्लॅन्सची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea ने आता Netflix सोबत भागीदारी केली आहे. यासह Netflix सोबत भागीदारी केल्यानंतर कंपनीने त्यांच्या प्लॅन्समध्ये मोफत Netflix सबस्क्रिप्शन देणे देखील सुरू केले आहे. कंपनीने मोफत Netflix सह दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत, ज्यांची किंमत 998 आणि 1399 रुपये इतकी आहे. हे दोन्ही प्लॅन्स दीर्घकालीन वैधतेसह येतात.

Vodafone Idea Vi 1799 Plan

VI चा 998 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या 998 रुपयांचा प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. इंटरनेट वापरासाठी या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा देखील समावेश आहे. तसेच, तुम्ही प्लॅनमध्ये 100 SMSचा लाभ घेऊ शकता. त्याबरोबरच, विशेषतः वापरकर्त्यांना Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल. सब्स्क्रिप्शनची वैधता देखील प्लॅनच्या वैधतेइतकीच राहील.

Netflix subscription jio plans

VI चा 1,399 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या 1,399 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा इंटरनेट वापरासाठी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा समावेश आहे. तसेच, तुम्हाला या प्लॅनमध्ये 100 मोफत SMS चा लाभ घेता येईल. तसेच, विशेषतः या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. हे सब्स्क्रिप्शन देखील 84 दिवसांसाठी उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :