VI युजर्सची मज्जाच मजा! ‘या’ प्लॅन्समध्ये लोकप्रिय फूड App चे महागडे सब्सक्रिप्शन वर्षभर Free। Tech News

Updated on 25-Jan-2024
HIGHLIGHTS

Vodafone Idea (VI) कडून पोस्टपेड युजर्ससाठी महत्त्वाची घोषणा

ग्राहकांना मोफत Swiggy One सबस्क्रिप्शन ऑफर करण्यात येत आहे.

ही ऑफर VI Max प्लॅन्ससह रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी असणार आहे.

Vodafone Idea (VI) ने एक महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, ते निवडक मोबाईल ग्राहकांना मोफत Swiggy One सबस्क्रिप्शन ऑफर करतील. Vodafone Idea देशातील सर्वात मोठ्या पोस्टपेड मोबाइल सेवा प्रदात्यांपैकी एक आहे आणि ही ऑफर VI Max प्लॅन्ससह रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी असणार आहे. एका रिलीजमध्ये कंपनीने म्हटले की, स्विगी वन सबस्क्रिप्शन आपल्या ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय जोडतो, त्याची किंमत 2500 रुपये आहे.

Swiggy One सब्सक्रिप्शन कसे मिळेल?

केवळ VI Max पोस्टपेड 501 रुपये किंवा त्याहून अधिकच्या प्लॅनसह रिचार्ज करणारे ग्राहक Swiggy One सबस्क्रिप्शनचे लाभ घेऊ शकतील. त्यामुळे एकूणच 501 रु., ​​701 रु., 1101 रु., 1001 रु आणि 1151 रुपयांच्या प्लॅनसह युजर्सना Swiggy One सबस्क्रिप्शनचे ऍक्सेस मिलेल. हे प्लॅन्स आधीपासूनच सदस्यांसाठी अनेक अतिरिक्त फायद्यांसह येतात.

Swiggy One वापरकर्त्यांना 149 रुपयांपेक्षा अधिकच्या ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी आणि 30000+ रेस्टॉरंटमध्ये 30% पर्यंत अतिरिक्त सवलत मिळेल. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना इन्स्टामार्टवर 199 रुपयांपेक्षा अधिकच्या ऑर्डरवर देखील मोफत डिलिव्हरी मिळेल. तसेच, ग्राहकांना Dineout वर 40% सूट दिली जाईल आणि 150 रुपये प्रति महिना दोन अतिरिक्त कूपन देखील मिळतील. तसेच, सर्व Swiggy Genie डिलिव्हरी फीवर 10% सूट मिळेल.

लक्षात घ्या की, Swiggy One साठी VI ने ऑफर केलेला ऍक्सेस एका वर्षासाठी उपलब्ध आहे. त्याबरोबरच, आणखी दोन व्हाउचर आहेत, ज्यांची वैधता देखील एक चतुर्थांश आहे.

VI Max पोस्टपेड प्लॅन्समध्ये मिळणारे अतिरिक्त लाभ

या प्लॅन्सच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये EaseMyTrip, SonyLIV, Disney+ Hotstar आणि Amazon Prime Video यांसारखे OTT लाभ आणि Norton 360 Mobile Security सोबत सुरक्षा फायदे आणि EazyDiner आणि Swiggy One सबस्क्रिप्शन यांसारखे फूड बेनिफिट देखील समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त, तुम्हाला प्राधान्य ग्राहक सेवा आणि Vi पोस्टपेड प्लॅनसह क्रेडिट कार्ड मर्यादा सेट करणे यासारखे इतर फायदे देखील दिले जातील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :