Limited Time Offer! Vodafone Idea ची अप्रतिम ऑफर, तब्बल 50GB एक्सट्रा डेटासह OTT सबस्क्रिप्शन्स मिळतोय Free

Updated on 20-Aug-2024
HIGHLIGHTS

Vodafone Idea ने स्वातंत्र्य दिनानिमित्त अप्रतिम ऑफर जाहीर केली.

Vodafone Idea ची ही ऑफर 13 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

ऑफर अंतर्गत, कंपनी ग्राहकांना 30GB ते 50GB पर्यंत मोफत अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे.

Vodafone Idea नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन्स आणि ऑफर्स जाहीर करत असते. कंपनीने ग्राहकांसाठी आता आणखी एक ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना अतिरिक्त डेटा आणि OTT फायदे देत आहे. जर तुम्ही Vi चे ग्राहक असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, नुकतेच भारताचा राष्ट्रीय सण म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन पार पडला. ही ऑफर Vodafone Idea कंपनीने आपल्या युजर्ससाठी खास स्वातंत्र्यदिनी जाहीर केली आहे.

Vodafone-idea

Vodafone Idea ची नवी ऑफर

वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी खास स्वातंत्र्यदिनी ऑफर सादर केली आहे. महत्त्वाचे लक्षात घा ही ऑफर 13 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला 13 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान प्लॅन खरेदी करावे लागेल. या ऑफरमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी यामध्ये ग्राहकांना 30GB ते 50GB पर्यंत मोफत अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे.

पुढील प्लॅनसह मिळेल ऑफरचा लाभ

Vodafone Idea चा 1,749 रुपयांचा प्लॅन

VI कंपनीचा 1,749 रुपयांच्या प्लॅन 180 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग फायदे मिळतात. याव्यतिरिक्त, नवीन ऑफर अंतर्गत हा प्लॅन वापरकर्त्यांना 30GB अतिरिक्त डेटा देत आहे, जो तुम्ही 45 दिवसांसाठी वापरू शकता.

Vodafone Idea चा 3,449 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea चा हा प्लॅन वार्षिक वैधतेसह म्हणेजच संपूर्ण 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि SMS चे बेनिफिट्स मिळतात. त्याबरोबरच, ऑफरअंतर्गत या प्लॅनमध्ये तुम्हाला 50GB अतिरिक्त डेटा मिळेल, जो तुम्ही 90 दिवसांसाठी वापरण्यास सक्षम असाल.

Vodafone Idea plans

Vodafone Idea चा 3,624 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea चा 3,624 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह म्हणेजच वर्षभराच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसारखे फायदे मिळतात. तसेच, ऑफरअंतर्गत या प्लॅनमध्ये तुम्हाला 50GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल, जो तुम्ही 90 दिवसांसाठी वापरण्यास सक्षम असाल.

Vodafone Idea चा 3,699 रुपयांचा प्लॅन

यादीतील शेवटचा Vodafone Idea प्लॅन देखील 365 दिवसांच्या म्हणजेच वार्षिक वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि SMS सारखे फायदे मिळतात. ऑफर अंतर्गत, या प्लॅनमध्ये तुम्हाला 50GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल, जो तुम्ही 90 दिवसांसाठी वापरू शकता. याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी मोफत Amazon Prime मोबाईल सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :