Vodafone Idea च्या स्वस्त प्लॅनमध्ये 5GB डेटा मिळतोय Free, जाणून घ्या किंमत आणि फायदे। Tech News 

Vodafone Idea च्या स्वस्त प्लॅनमध्ये 5GB डेटा मिळतोय Free, जाणून घ्या किंमत आणि फायदे। Tech News 
HIGHLIGHTS

टेलिकॉम कंपनी आपल्या स्वस्त 299 रुपयांच्या प्लॅनसह अतिरिक्त डेटा लाभ देत आहे.

या प्लॅनमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना 1.5GB डेटा सुविधा देत आहे.

Binge All Night Data, विकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट्सदेखील उपलब्ध

अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Vodafone Idea कंपनी सतत नवनवीन ऑफर घेऊन येत आहे. VI अशी एकमेव कंपनी आहे की, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटाचे अतिरिक्त फायदे 299 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्लॅनमध्ये प्रदान करते. दरम्यान, आता कंपनीने आपल्या स्वस्त प्लॅनसह अतिरिक्त डेटाचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कंपनी आपल्या कोणत्या स्वस्त प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदे देत आहे.

लक्षात घ्या की, याआधीही कंपनी मर्यादित कालावधीसाठी अतिरिक्त डेटा लाभ ऑफर घेऊन आली आहे. आता पुन्हा एकदा टेलिकॉम कंपनी आपल्या स्वस्त 299 रुपयांच्या प्लॅनसह अतिरिक्त डेटा लाभ देत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही ऑफर रिचार्ज केल्यानंतर फक्त 3 दिवसांपर्यंत उपलब्ध असेल. प्लॅनमधील उपलब्ध सर्व फायदे सविस्तरपणे वाचा.

Vodafone Idea Vi top class recharge plans
Vodafone Idea

VI चा 299 रुपयांच्या प्लॅन

VI चा 299 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना 1.5GB डेटा सुविधा देत आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील आहे आणि युजर्सना दररोज 100 मोफत SMS ही मिळतात. ऑफर अंतर्गत आता कंपनी या प्लॅनमध्ये 5GB अतिरिक्त डेटा देखील देत आहे. म्हणजेच, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 47GB डेटा ऍक्सेस मिळणार आहे. हा स्वस्त प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.

अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटासह अनेक अतिरिक्त फायदे देतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटासह Binge All Night सुविधा मिळेल. Binge All Night Data बद्दल बोलायचे झाले तर, वापरकर्त्यांना मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित मोफत डेटा मिळतो. हा डेटा वापरकर्त्यांच्या दैनंदिन डेटा कोट्यातून वजा केला जात नाही.

तसेच, वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देखील यात देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत युजर्स आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार आणि रविवारी सोमवार ते शुक्रवार दरम्यान वापरला न गेलेला उर्वरित डेटा वापरू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo