Vodafone Idea ग्राहकांची मज्जाच मजा! लकी ग्राहकांना मिळेल 50GB बोनस डेटा Free, ‘या’ प्लॅनसह लाभ उपलब्ध  

Vodafone Idea ग्राहकांची मज्जाच मजा! लकी ग्राहकांना मिळेल 50GB बोनस डेटा Free, ‘या’ प्लॅनसह लाभ उपलब्ध  
HIGHLIGHTS

Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांना आकर्षक ऑफर आणली आहे.

Vodafone Idea ने आपल्या स्वस्त लोकप्रिय प्लॅनवर 50GB डेटा मोफत मिळत आहे.

Vodafone Idea ग्राहकांच्या मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये OTT लाभ देखील मिळेल.

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea आपल्या ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच VI ने आपल्या प्लॅन्सच्या किमतीत वाढवून ग्राहकांना जरा नाराज केले आहे. मात्र, कंपनीने आपल्या परंपरेवर कायम राहून ग्राहकांसाठी भेटवस्तू देखील आणली. VI आपल्या ग्राहकांना एका प्लॅनमध्ये तब्बल 50GB बोनस डेटा मोफत देत आहे. या ऑफरसह VI ने ग्राहकांना चांगला दिलासा दिला आहे.

‘या’ प्लॅनसह मिळतेय जबरदस्त ऑफर

लक्षात घ्या की, Vodafone Idea ही भेट कंपनीच्या पोस्टपेड यूजर्सना दिली आहे. होय, कंपनी 451 रुपयांच्या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनसह ग्राहकांना 50GB बोनस डेटा मोफत देत आहे. कंपनीने म्हटले की, कोणताही पोस्टपेड यूजर जो 451 रुपयांचा रिचार्ज प्लॅन खरेदी करणार आहे. या सर्वांना VI कडून मोफत 50GB बोनस डेटा दिला जाणार आहे.

Vodafone Idea चा 451 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

होय, दरवाढीनंतर कंपनीच्या या निर्णयामुळे साहजिकच ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे, असे सांगितले जात आहे.

Vodafone Idea चा 451 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Vodafone Idea च्या 451 रुपयांच्या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन आतापर्यंत फक्त 401 रुपयांमध्ये उपलब्ध होता. दरवाढीनंतर हा प्लॅन 451 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. बेनिफिट्समध्ये कंपनीचा हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगने सुसज्ज आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिना 3000SMS ची सुविधा मिळते. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200GB डेटा रोलओव्हरची सुविधा मिळेल. यासह प्लॅनमध्ये या ग्राहकांना 50GB FUP मर्यादेसह डेटा मिळतो.

Vodafone Idea Rs 451 Postpaid Plan
Vodafone Idea Rs 451 Postpaid Plan

ग्राहकांच्या मनोरंजनासाठी हा प्लॅन ग्राहकांना काही OTT लाभ देखील देतो. या प्लॅनमध्ये, Vi Games सोबत, तुम्हाला SunNXT, Disney + Hotstar, SonyLIV, EaseMyTrip डिस्काउंट इ. चा ऍक्सेस मिळतो. याशिवाय, यामध्ये नॉर्टनचा ऍक्सेस उपलध आहे. मात्र, लक्षात घ्या की, Vi Games सह तुम्ही फक्त 1 OTT सबस्क्रिप्शनचा लाभ घेऊ शकता.

मात्र, आता या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना वेगळा 50GB बोनस डेटाही दिला जात आहे. म्हणजेच ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये 100GB डेटा देखील मिळणार आहे. हा लाभ नवीन ग्राहकांना दिला जात आहे.मात्र, जुन्या VI ग्राहकांना हा लाभ घेता येईल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, कंपनी हे करत असेल तर त्याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर नक्कीच होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo