Vodafone idea 5G launch in mumbai
भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी Vodafone Idea (Vi) ने त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल वापरकर्त्यांसाठी 5G सर्व्हिस आणली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या 5G सेवा मुंबईत उपलब्ध आहेत, परंतु लवकरच ती भारताच्या इतर भागात देखील विस्तारणार आहे. दरम्यान, VI ने त्यांच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की, सर्व पोस्टपेड प्लॅनसह जर वापरकर्ते 5G कव्हरेज क्षेत्रात असतील तर, त्यांना अमर्यादित 5G डेटा मिळेल.
Vi च्या पोस्टपेड मोबाईल वापरकर्त्यांसाठी हे सकारात्मक आहे. प्रीपेड वापरकर्त्यांसाठी, Vi ने अद्याप कोणतेही अटी आणि शर्ती निश्चित केलेल्या नाहीत. प्रीपेड वापरकर्त्यांसाठी कोणत्या प्रकारचे प्लॅन 5G बंडल करतील, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र, 299 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत अमर्यादित 5G बंडल आहे. VI ने त्यांच्या वेबसाइटवर नमूद केले आहे की, ही परिचयात्मक अमर्यादित 5G डेटा ऑफर 5G कव्हरेज क्षेत्रातील 299 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सर्व प्रीपेड अमर्यादित प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.
खाली दिलेल्या प्लॅनसह अमर्यादित 5G उपलब्ध असेल:
Vodafone Idea च्या 299 रुपये, 365 रुपये, 349 रुपये, 479 रुपये, 719 रुपये, 3599 रुपये, 3699 रुपये, 3799 रुपये, 3499 रुपये, 859 रुपये, 979 रुपये, 579 रुपये, 795 रुपये, 649 रुपये, 449 रुपये, 994 रुपये, 1749 रुपये इ. प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनसह अमर्यादित 5G डेटाची सुविधा मिळेल. VI च्या या प्लॅन्सबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही VI ची अधिकृत वेबसाईट किंवा येथे क्लिक करू शकता.
Vi ने आधीच पुष्टी केली आहे की ते मुंबईत प्रथम 5G लाँच करणार आहेत. काही भागांमध्ये हे उपलब्ध देखील आहेत. मुंबईनंतर पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये, ते त्यांच्या 5G नेटवर्कची उपस्थिती बेंगळुरू, चंदीगड, दिल्ली आणि पटनासह इतर शहरांमध्ये वाढवेल, अशी माहिती VI ने दिली आहे.
Jio-Airtel 5G या भारतातील सर्वात आघाडीच्या टेलिकॉम दिग्गज आहेत. जवळपास दोन अडीच वर्षांपूर्वी दोन्ही कंपन्यांनी आपली 5G सर्व्हिस रोलआऊट केली आहे. TelecomTalk नुसार, आम्ही तुम्हाला सांगतो की, 5G मिळविण्यासाठी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा प्लॅन रिचार्ज करणे आवश्यक आहे. VI देखील आता अशाच प्रकारच्या रणनीतीवर काम करत आहे. Vi च्या पोस्टपेड वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.