Limited Time Offer! टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea ‘या’ प्लॅन्ससह देतोय बोनस डेटा एकदम Free, पहा डिटेल्स

Updated on 06-Sep-2024
HIGHLIGHTS

Vodafone Idea ने निवडक प्लॅन्ससह अतिरिक्त 5GB डेटा ऑफर जाहीर केली.

Vodafone Idea कंपनी 349, 579 आणि 859 रुपयांच्या प्लॅनसह अतिरिक्त डेटा देत आहे.

Vodafone Idea ची ही नवी ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

Vodafone Idea VI भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम प्रदाता आहे. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक आकर्षक प्लॅन्स आहेत. एवढेच नाही तर, कंपनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच काही ना काही ऑफर्स सादर करत असते. या ऑफरअंतर्गत, तुम्हाला निवडक प्लॅन्ससह नियमित डेटासोबत अतिरिक्त डेटा देखील ऑफर केला जात आहे. मात्र, ही अतिरिक्त डेटा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vodafone Idea च्या नव्या ऑफरबद्दल सविस्तर तपशील-

Vodafone Idea ऑफर

Vodafone Idea ने आपल्या तीन लोकप्रिय प्लॅन्स 349, 579 आणि 859 रुपयांच्या प्लॅनसह अतिरिक्त डेटा देण्यात ऑफर जाहीर केली आहे. Vi प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला 5GB डेटा केवळ 3 दिवसांसाठी सक्रिय असेल. म्हणजेच तीन दिवसांत 5GB डेटा वापरावा लागेल. यानंतर डेटा आपोआप कालबाह्य होईल. तुम्ही Vodafone Idea च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या ऑफरसह हे प्लॅन रिचार्ज करू शकता. येथे क्लिक करा

VI चा 349 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या या प्रीपेड प्लानमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जात आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ऑफरअंतर्गत 5GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. त्याबरोबरच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळत आहे. या प्रीपेड पॅकमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Date Delights चा ऍक्सेस दिला जात आहे.

Vodafone Idea

Vi चा 579 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा ऑफर केला जातो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS ची सुविधा दिली जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये Binge ऑल नाईट आणि वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा उपलब्ध आहे. हा प्लॅन एकूण 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. ऑफरसह या प्लॅनमध्ये 5GB डेटा दिला जात आहे.

Vi चा 859 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea कंपनी या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1.5GB डेटा देत मिळणार आहे. या प्लॅनसह देखील तुम्हाला अमर्यादित कॉलिंगची सुविधा आणि दररोज 100SMS मिळतील. यासोबतच, रात्रभर अमर्यादित कॉलिंग, बिंज आणि डेटा रोलओव्हर यासारख्या सेवा दिल्या जात आहेत. तर नव्या ऑफरअंतर्गत या प्लॅनमध्ये 5GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता एकूण 84 दिवसांची आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :