Vodafone Idea ने युजर्ससाठी आणली धमाकेदार ऑफर! ‘या’ प्लॅन्ससह Free मिळतोय तब्बल 130GB डेटा 

Vodafone Idea ने युजर्ससाठी आणली धमाकेदार ऑफर! ‘या’ प्लॅन्ससह Free मिळतोय तब्बल 130GB डेटा 
HIGHLIGHTS

Vodafone Idea आपल्या तीन प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे.

हा डेटा 299, 349 आणि 579 रुपयांच्या प्लॅनसह मिळत आहे.

Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये 130GB अतिरिक्त डेटाही दिला जात आहे.

Vodafone Idea देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी VI त्याच्या वापरकर्त्यांना विविध बेनिफिट्ससह अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन ऑफर्स सादर करत असते. लक्षात घ्या की, सध्या टेलिकॉम कंपनी काही प्लॅनसह आपल्या यूजर्सना 130GB अतिरिक्त डेटा देत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, वापरकर्त्यांना 299 रुपये आणि त्यावरील दोन प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा मिळत आहे. या सर्व प्लॅनमध्ये डेटासह कॉलिंग आणि इतर अप्रतिम बेनिफिट्सचा देखील समावेश आहे.

Vodafone Idea एक्सट्रा डेटा ऑफर

Vodafone Idea आपल्या तीन प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 130GB अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. हा डेटा 299, 349 आणि 579 रुपयांच्या प्लॅनसह मिळत आहे.

Vodafone Idea offers 130gb extra data free

Vodafone Idea चा 299 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनच्या यादीतील पहिला प्लॅन 299 रुपयांचा आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1.5GB डेटा मिळतो. याशिवाय यामध्ये दररोज 100SMS आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. ऑफरअंतर्गत, या प्लॅनमध्ये 130GB अतिरिक्त डेटाही दिला जात आहे.

Vodafone Idea चा 349 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा आणि 100 मोफत SMS दिले जातात. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील आहे. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईट्स सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. याशिवाय, 130GB अतिरिक्त डेटा देखील उपलब्ध आहे.

Vodafone Idea plans
Vodafone Idea plans

Vodafone Idea चा 579 रुपयांचा प्लॅन

579 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा मिळतो. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. याशिवाय, प्लॅनमध्ये 130GB अतिरिक्त डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये देखील डेटा रोलओव्हरची सुविधा उपलब्ध आहे.

एक्सट्रा डेटासाठी ‘अशा’प्रकारे क्लेम करा.

Vodafone Idea अतिरिक्त डेटा ऑफरचा दावा करण्यासाठी युजर 199199# नंबरवर कॉल करू शकतात. याशिवाय, तुम्ही VI च्या ॲपवर जाऊन देखील दावा करू शकता. अशा प्रकारे, VI वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटा मिळू शकतो. ऑफरबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo