Vodafone Idea Vi 56 Days Recharge Plans 2025 offer upto 3gb data daily and unlimited call
VI New Plans: आपणा सर्वांना माहितीच आहे की, भारतातील सर्वात मोठा खेळ महोत्सव IPL 2025 उद्या म्हणजेच 22 मार्चपासून सुरु होणार आहे. क्रिकेटप्रेमींची हीच क्रेझ लक्षात घेऊन प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने भारतीय बाजारात तीन नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 239 रुपये, 399 रुपये आणि 101 रुपये आहे. लक्षात घ्या की, तिन्ही प्लॅन्समध्ये JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. याद्वारे, वापरकर्ते कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता त्यांच्या फोनवरच IPL चे सर्व सामने पाहू शकतील.
101 रुपयांचा प्लॅन हा एक डेटा व्हाउचर आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या पॅकमध्ये एकूण 5GB डेटा उपलब्ध आहे. या पॅकमध्ये तुम्हाला JioHotstar मोबाईलचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवस म्हणजे संपूर्ण एका महिन्याची आहे. इतर प्रीपेड प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटा देखील उपलब्ध आहे.
239 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vodafone Idea आपल्या वापरकर्त्यांना इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटा देत आहे. या पॅकमध्ये एकूण 200SMS उपलब्ध आहेत. इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. या पॅकमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत आहे.
Vodafone Idea चा 399 रुपयांचा प्लॅन हा या यादीतील महागडा प्लॅन आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. या पॅकमध्ये दररोज 100SMS आणि 2GB डेटा दिला जात आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळत आहे. या सुविधेसह तुम्ही आठवड्याच्या शेवटी उर्वरित डेटा वापरण्यास सक्षम असाल. रिचार्ज प्लॅनमध्ये JioHotstar मोबाईलचा ऍक्सेस मोफत उपलब्ध आहे. या प्रीपेड पॅकची वैधता वरील प्लॅनप्रमाणे 28 दिवसांची आहे.