दूरसंचार कंपनी Vodafone Idea ने काही नवीन प्लॅन सादर केले आहेत. आपल्या प्रतिस्पर्धी Jio आणि Airtel ला स्पर्धा देण्यासाठी कंपनीने 180 दिवसांची वैधता असलेला प्लॅन लाँच केला आहे. यासोबतच, आणखी दोन प्लॅन्स सादर करण्यात आल्या आहेत. नव्या प्लॅन्सची किंमत आणि बेनिफिट्स जाणून घेऊया.
Vi चा 549 रुपयांचा प्लॅन 180 दिवसांच्या वैधतेसह येतो. यासोबत 1GB डेटा दिला जात आहे. राष्ट्रीय कॉलसाठी 2.5 पैसे/सेकंद दराने शुल्क आकारले जाईल. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात नाही. यामध्ये SMS चाही समावेश नाही. हा प्लॅन केवळ त्यांच्यासाठी आहे, ज्यांना Vi चे सिम सेकंडरी सिम म्हणून वापरायचे आहे.
Vi ने नुकतेच 368 रुपयांचा प्लॅन सादर केला होता, ज्याची वैधता 30 दिवसांची आहे. दररोज 2GB डेटा दिला जाईल. संपूर्ण वैधतेदरम्यान प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 60GB डेटा मिळेल. अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाईल. याशिवाय SUN NXT ऍपवर प्रवेश दिला जाईल. यामध्ये दररोज 100SMS दिले जातील. वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा आणि Vi चित्रपट आणि टीव्हीचे सबस्क्रिप्शन दिले जाईल.
या प्लॅनमध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे दररोज 2GB डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS दिले जात आहेत. त्यासोबतच, यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा दिली जात आहे. याव्यतिरिक्त, Vi movies, Sony LIV ऍप आणि टीव्ही ऍप्सचाही ऍक्सेस मिळेल.