Vodafone Idea New Plan: कंपनीने लाँच केले नवे इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स, किंमत फक्त  749 रुपयांपासून सुरु। Tech News

Updated on 03-May-2024
HIGHLIGHTS

VI ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्स लाँच केले.

नवे प्लॅन्स हे Vodafone Idea चे पोस्टपेड विभागात लाँच केले गेले आहेत.

Vodafone Idea (Vi) ने चार नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड प्लॅन सादर केले.

Vodafone Idea ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे. Vodafone Idea VI ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्स लाँच केले आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Vi नवनवीन प्लॅन्स सादर करत असते. खरं तर, नवे प्लॅन्स Vodafone Idea चे पोस्टपेड विभागात लाँच केले आहेत, ज्यांची किंमत केवळ 749 रुपयांपासून सुरू होते. चला तर मग जाणून घेऊयात या प्लॅन्ससोबत संबंधित सर्व तपशील-

Vodafone Idea च्या नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea (Vi) च्या नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड प्लॅनची ​सुरुवातीची ​किंमत 749 रुपये आहे. तर, दुसऱ्या प्लॅनची ​​किंमत 3,999 रुपये इतकी आहे. त्याबरोबरच, 4,999 रुपये आणि अखेर 5,999 रुपयांचा प्लॅनदेखील सादर केला गेला आहे.

749 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 749 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 24 तासांपर्यंत म्हणजेच एका दिवसाची वैधता मिळते. याशिवाय, या प्लॅनमध्ये 10MB डेटाची सुविधा देण्यात आली आहे. त्याबरोबरच, यात कॉलिंगसाठी 50 मिनिटे देण्यात आली आहेत. या पॅक अंतर्गत तुम्हाला 5 SMS पाठवण्याची सुविधा मिळेल.

3,999 रुपयांचा प्लॅन

3999 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 10 दिवसांपर्यंत वैधता मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये 2GB डेटा आणि कॉलिंगसाठी 200 मिनिटे मिळतात. या पॅक अंतर्गत तुम्हाला 10SMS पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

4,999 रुपयांचा प्लॅन

4999 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 14 दिवसांपर्यंत वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 2GB डेटा आणि कॉलिंगसाठी 200 मिनिटे मिळतील. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 10SMS देखील पाठवण्याची सुविधा आहे.

5,999 रुपयांचा प्लॅन

5,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांपर्यंत वैधता मिळेल. इंटरनेट वापरण्यासाठी या प्लॅनमध्ये 5GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, यामध्ये कॉलिंगसाठी 300 मिनिटे मिळतात. या पॅकमध्ये वापरकर्ते 10SMS देखील पाठवता येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :