प्रसिद्ध Vodafone Idea (Vi) ही भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन विशेषतः कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि जॉर्डनला जाणाऱ्या भारतीयांसाठी सादर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर-
Vodafone Idea कंपनीने आपल्या पोस्टपेड पोर्टफोलिओमध्ये हा नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक सादर केला आहे. VI च्या या प्लॅनची सुरुवातीची किंमत फक्त 649 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये लवचिक रोमिंग पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजेच तुम्ही हा प्लॅन 24 तास, 10 दिवस, 14 दिवस आणि 30 दिवसांसाठी सक्रिय करू शकता.
यावरूनच समजते की, तुम्ही हा प्लॅन तुमच्या गरजेनुसार खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये ‘AlWAYS ON’ फिचर देखील प्रदान केले आहे, जो वापरकर्त्यांना युसेज पॅक एक्सपायर झाल्यावर हाय इंटरनॅशन रोमिंग चार्जपासून बचाव करतो.
Vodafone Idea (Vi) ने अलीकडेच आपल्या पोस्टपेड ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. यापूर्वी कंपनी 751 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा ऑफर करत होती. मात्र, आता या प्लॅनमध्ये यूजर्सना फक्त 150GB डेटा मिळणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हरची सुविधा देखील देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये OTT सबस्क्रिप्शनदेखील उपलब्ध आहे. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.