Amazing! Vodafone Idea ने Maldives साठी लाँच केला नवीन इंटरनॅशनल प्लॅन, जाणून घ्या किंमत। Tech News

Updated on 27-Dec-2023
HIGHLIGHTS

Vodafone Idea (Vi) ने नवीन वर्षाच्या निमित्ताने लाँच केला इंटरनॅशल प्लॅन

बहुतेक लोक नवीन वर्षाच्या निमित्ताने सुट्टीचे नियोजन करतात.

महत्त्वाचे म्हणजे कंपनीने हा प्लॅन खासकरून Maldives साठी लाँच केला आहे.

Vodafone Idea (Vi) ने नवीन वर्षाच्या निमित्तावर आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन इंटरनॅशनल प्लॅन्स लाँच केले आहेत. बहुतेक लोक नवीन वर्षाच्या निमित्ताने सुट्टीचे नियोजन करतात. जर तुम्ही Vodafone Idea चे ग्राहक असाल आणि इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करत असाल तर कंपनीचा हा नवीन प्लॅन केवळ तुमच्यासाठी आहे. विशेषतः हे प्लॅन्स भारतीयांचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन असलेल्या Maldives साठी सादर केले गेले आहेत.

लक्षात घ्या की, केवळ नवीन प्लॅनच नाही तर कंपनीने सध्याच्या आंतरराष्ट्रीय प्लॅनमध्येही काही बदल केले आहेत. कंपनीने त्या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा आणि कॉलिंगची सुविधा देखील समाविष्ट केली आहे. चला तर मग फार वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या प्लॅन्सची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

vodafone idea

VI चा 2,999 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea (Vi) च्या नवीन इंटरनॅशनल प्लॅनची किंमत 2999 रुपये आहे. वर सांगितल्याप्रमाणे मालदीवसाठी हा प्लॅन लाँच केला गेला आहे. प्लॅनची ​​वैधता संपूर्ण 10 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये यूजर्सना 5GB हाय-स्पीड डेटाची सुविधा मिळते. याशिवाय, कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंगसाठी 100 मिनिटे उपलब्ध आहेत. याशिवाय 10 आउटगोइंग SMS आणि अनलिमिटेड इनकमिंग SMS ची सुविधाही यात देण्यात आली आहे.

जर युजर्सचे डेटा, कॉलिंग आणि SMS मर्यादा संपली तर या प्लॅनअंतर्गत त्यांना भारतात कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 3 रुपये द्यावे लागतील. तर, भारताव्यतिरिक्त कोठेही कॉल करण्यासाठी तुम्हाला 35 रुपये प्रति मिनिट शुल्क आकारले जाईल. तर 5GB डेटा मर्याद संपल्यानंतर 1MB साठी 1 रुपये शुल्क आकारले जाईल.तुम्ही Vi APP आणि वेबसाइटवरून हे प्लॅन्स सक्रिय करू शकता.

vodafone idea

VI चा 3,999 रुपयांचा प्लॅन

VI कंपनीने 3,999 रुपयांचा इंटरनॅशनल प्लॅनदेखील सादर केला आहे. हा प्लॅन USA, UK, इटली, मलेशिया, जर्मनी, सिंगापूर, ब्राझील सारख्या 100 देशांमध्ये वापरली जाऊ शकते. मात्र लक्षात घ्या की, सध्या Maldives चा या प्लॅनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :