भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवा स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. होय, VI ने युजर्ससाठी 30 रुपयांपेक्षा कमी किमती नवा प्लॅन सादर केला आहे. लक्षात घ्या की, हा Vodafone Idea चा नवा डेटा प्लॅन आहे. अलीकडेच समान किमतीत प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने आपल्या यूजर्ससाठी समान किमतीत प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन त्या युजर्ससाठी आहे, ज्यांना जास्तीत जास्त डेटाची गरज असते. जाणून घ्या Vodafone Idea च्या नव्या डेटा प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
Also Read: Samsung Galaxy M15 5G Prime Edition: तब्बल 6000mAh बॅटरीसह नवा फोन लाँच, जाणून घ्या किंमत
वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea चे डेटा व्हाउचर आहे. कंपनीने या नवा डेटा प्लॅनची किमत 26 रुपये इतकी निश्चित केली आहे. अलीकडेच Airtel ने सुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवा 26 रुपयांचा प्लॅन समाविष्ट केला आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 1.5GB डेटा देण्यात आला आहे.
लक्षात घ्या की, Vodafone Idea चा 26 रुपयांचा प्लॅन केवळ एका दिवसाच्या वैधतेसह येतो. म्हणजेच दिवसा अखेर या प्लॅनची वैधता संपेल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, या पॅकमध्ये कॉलिंग आणि SMS सारखे कोणतेही बेनिफिट्स उपलब्ध नाहीत. थोडक्यात या प्लॅनमध्ये Vi One सेवा उपलब्ध नाहीत. हा पॅक फक्त डेटा ऑफर करतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे डेटा व्हाउचर फक्त तुमच्या नंबरवर बेसिक प्लॅन सक्रिय असेल तेव्हाच वैध असेल. जर तुमच्या नंबरवर कोणतेही प्लॅन ऍक्टिव्ह नसेल, तर हे प्लॅन कार्य करणार नाही. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.
Airtel ने अलीकडेच आपल्या डेटा पॅक पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन समाविष्ट केला आहे. या प्लॅनची किंमत देखील वरील प्लॅनप्रमाणे फक्त 26 रुपये इतकी आहे. Airtel चा हा डेटा पॅक 1.5GB डेटा सुविधेसह येतो. Airtel च्या या प्लॅनची वैधता देखील फक्त 1 दिवसापर्यंत आहे. तसेच, डेटा कोटा संपल्यानंतर, प्रति MB 50 पैसे शुल्क देखील आकारले जाईल. सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.