Vodafone Idea New Plan: OTT लव्हर्सची मज्जाच मजा! कंपनीने लाँच केला 248 रुपयांचा नवीन प्लॅन। Tech News 

Vodafone Idea New Plan: OTT लव्हर्सची मज्जाच मजा! कंपनीने लाँच केला 248 रुपयांचा नवीन प्लॅन। Tech News 
HIGHLIGHTS

Vodafone Idea च्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना एकाच वेळी अनेक OTT ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल

Vodafone Idea (Vi) च्या नव्या प्लॅनची ​​किंमत केवळ 248 रुपये आहे.

Vodafone Idea चा 248 रुपयांचा प्लॅन एक डेटा व्हाउचर आहे.

भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने नवा प्लॅन लाँच केला आहे. Vodafone Idea नेहमीच आपल्या प्लॅन्समध्ये अप्रतिम बेनिफिट्स देण्यासाठी ओळखली जाते. आता कंपनीच्या या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना एकाच वेळी अनेक OTT ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. होय, कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी 248 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

Also Read: AI फीचर्ससह सुसज्ज Motorola Edge 50 Pro वर मिळतोय बंपर Discount, बघा Best ऑफर

जर तुम्ही OTT प्रेमी असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. केवळ OTT फायदेच नाही तर हा प्लॅन वापरकर्त्यांना डेटा आणि इतर महत्त्वाचे बेनिफिट्स देखील ऑफर करतो. एकूणच, हा Vodafone Idea चा डेटा व्हाउचर प्लॅन आहे, ज्यामध्ये मोफत OTT सबस्क्रिप्शन देखील मिळतील.

Vodafone Idea plans
Vodafone Idea plans

Vodafone Idea चा 248 रुपयांचा प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea (Vi) च्या नव्या प्लॅनची ​​किंमत 248 रुपये आहे. हे कंपनीचे नवे डेटा व्हाउचर आहे. या डेटा व्हाउचरसह कंपनीने वापरकर्त्यांच्या मनोरंजनाचीही काळजी घेतली आहे. Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये यूजर्सला 6GB डेटा मिळतो. डेटा व्यतिरिक्त हा प्लॅन Vi Movies & TV (MTV) Pro चे सदस्यत्व देखील देतो.

याव्यतिरिक्त, यामध्ये युजर्सच्या मनोरंजनाची सुद्धा काळजी घेतली गेली आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Disney + Hotstar, SonyLIV, FanCode, Klikk, Manorama Max, Chaupal, Playflix, Nammaflix, Distro TV, Shemaroo Me, Hungama, YuppTV, NexGTV आणि Pocket सारख्या प्लॅटफॉर्मचे ऍक्सेस मिळेल. तुम्ही हे OTT प्लॅटफॉर्म कंटेंट टीव्हीवर तसेच फोनवर ॲक्सेस करू शकता. यासोबतच, या प्लॅनमध्ये 400 हून अधिक टीव्ही चॅनेलही उपलब्ध आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Vodafone Idea चा हा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. मात्र हा प्लॅन वापरण्यासाठी तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची ​​आवश्यकता आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS चे बेनिफिट्स समाविष्ट नाहीत. कॉलिंग आणि SMS साठी तुम्हाला दुसऱ्या बेस प्लॅनची आवश्यकता असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo