Vodafone Idea ने लाँच केला नवा स्वस्त 19 रुपयांचा प्लॅन
अलीकडेच Vodafone Idea ने 49 रुपयांचा रिचार्ज पॅक अपडेट केला होता.
Vodafone Idea च्या डेटा व्हाउचरमध्ये OTT प्लॅन्सदेखील उपलब्ध
अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Vodafone Idea म्हणजेच VI आपल्या विद्यमान प्रीपेड प्लॅन्स बऱ्याच काळापासून अपडेट करत आहे. यासोबतच, नवीन रिचार्ज प्लॅनदेखील आणले जात आहेत. या सर्व प्लॅन्समध्ये आता पूर्वीपेक्षा जास्त फायदे देण्यात आले आहेत. दरम्यान, आता कंपनीने आणखी एक सर्वात स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने नवा प्लॅन केवळ 19 रुपयांना सादर केला आहे, त्यासह जबरदस्त फायदे देखील देण्यात आले आहेत.
VI चा 19 रुपयांच्या प्लॅन
Vodafone Idea च्या नवीन प्रीपेड प्लॅनची किंमत 19 रुपये आहे. कंपनीचा हा प्लॅन एक डेटा व्हाउचर आहे, जो 1 दिवसाच्या वैधतेसह येतो. यामध्ये 1GB डेटा इंटरनेट वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, त्यात कॉलिंग आणि SMS सुविधा उपलब्ध नाही. तसेच, त्यात कुठल्याही प्रीमियम ॲप्सचा ऍक्सेस देखील दिला जात नाही. हे व्हाउचर अशा वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल ज्यांना अधिक डेटा आवश्यक आहे.
अलीकडेच अँपडेट केलेले VI प्लॅन्स
19 रुपयांचा प्लॅन लाँच करण्यापूर्वी Vodafone Idea ने 49 रुपयांचा रिचार्ज पॅक अपडेट केला होता. या अपडेटनंतर आता यूजर्सना या रिचार्ज प्लानमध्ये 20GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता केवळ 1 दिवसाची आहे. यामध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे कॉलिंग आणि SMS दिले जात नाहीत. हा पॅक विशेषतः जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन अपडेट करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, Vodafone Idea ने काही दिवसांपूर्वी 169 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. हा प्रीपेड पॅक 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये रोजच्या डेटाऐवजी एकूण 8GB डेटा दिला जातो. यामध्ये Disney + Hotstar मोबाइल OTT ॲपचे सबस्क्रिप्शन 90 दिवसांसाठी म्हणजेच 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच, या प्लॅनमध्ये देखील कॉलिंग किंवा SMS ची सुविधा दिली जात नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.