Vodafone Idea ची आकर्षक नवरात्री Special ऑफर, तब्बल 50GB पर्यंत Free डेटा वर्षभरासाठी उपलब्ध। Tech News 

Vodafone Idea ची आकर्षक नवरात्री Special ऑफर, तब्बल 50GB पर्यंत Free डेटा वर्षभरासाठी उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Vodafone Idea ने नवरात्री निमित्त एक आकर्षक ऑफर आणली आहे.

ऑफर अंतर्गत, कंपनी आपल्या 3 प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा सुविधा देत आहे.

प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 50GB पर्यंत अतिरिक्त डेटा मिळेल.

अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Vodafone Idea ने नवरात्री निमित्त एक आकर्षक ऑफर आणली आहे. होय, सणासुदीच्या काळात Vi ने आपल्या ग्राहकांसाठी खास नवरात्री ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, टेलिकॉम कंपनी आपल्या विद्यमान प्लॅनमध्ये भरपूर अतिरिक्त डेटा देत आहे. या ऑफर अंतर्गत तीन प्लॅन्समध्ये अतिरिक्त डेटा देण्यात येणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 50GB पर्यंत अतिरिक्त डेटा मिळेल. बघा सविस्तर-

Vodafone Idea new plan

Vodafone Idea ची नवरात्री ऑफर

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Vodafone Idea ने नवरात्री ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी आपल्या 3 प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा सुविधा देत आहे. या प्लॅनची ​​किंमत 1449 रुपये, 2899 रुपये आणि 3099 रुपये आहे. विशेष म्हणजे हे प्लॅन्स 1 वर्षांपर्यंत येतात. आहे. त्याबरोबरच, यासोबत OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

Vi चा 1,449 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 1,449 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 180 दिवसांपर्यंत वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा आहे. नवरात्रीच्या ऑफर अंतर्गत कंपनी या प्लॅनमध्ये 30GB अतिरिक्त डेटा देणार आहे.

Vi चा 2,899 रुपयांचा प्लॅन

Vi चा 2,889 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह म्हणजेच संपूर्ण एका वर्षासाठी येतो. या प्लॅनमध्ये देखील इतर प्लॅन्सप्रमाणे, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा आहे. नवरात्री ऑफर अंतर्गत या प्लॅनमध्ये 50GB अतिरिक्त डेटा मिळेल.

vodafone idea

Vi चा 3099 रुपयांचा प्लॅन

Vi चा 3099 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS लाभ समाविष्ट आहेत. नवरात्री ऑफर अंतर्गत या प्लॅनमध्ये देखील 50GB अतिरिक्त डेटा देत आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनासाठी Disney+Hotstar सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

लक्षात घ्या की, वरील सर्व प्लॅन्स VI च्या ऍडिशनल बेनिफिट्ससह येतात. पुढील बेनिफिट्स इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी देत नाही. होय, वरील सर्व प्लॅन्समध्ये अमर्यादित डेटासह Binge All Night आणि वीकेंड डेटा रोलओव्हरचे फायदे समाविष्ट आहेत. नाईट डेटा लाभ मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटा प्रदान करतो. तसेच, सोमवार ते शुक्रवार दरम्याचा उर्वरित डेटा तुम्ही शनिवार आणि रविवारी वापरू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo