खरंच? फक्त ‘हा’ नंबर डायल करा आणि मिळवा तब्बल 130GB डेटा Free! बघा Vodafone Idea ची नवी स्कीम। Tech News
Vodafone Idea ने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी नवीन 'VI Guarantee Program' जाहीर केला आहे.
या प्रोग्राम अंतर्गत यूजर्सना तब्बल 130GB फ्री डेटा दिला जात आहे.
जाणून घ्या VI Guarantee Program मध्ये सहभागी होण्याची सोपी प्रक्रिया
देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea टेलिकॉम कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीन प्लॅन्स आणि ऑफर करत असते. दरम्यान, आता कंपनीने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी नवीन ‘VI Guarantee Program’ जाहीर केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत VI कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना 130GB डेटा मोफत देत आहे, अशी माहिती मिळाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता VI च्या या नवीन रोमांचक ऑफरशी संबंधित सर्व तपशील बघुयात-
Also Read: आगामी Lava Yuva 5G फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म! किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी? Tech News
VI Guarantee Program
वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea ने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी ‘VI Guarantee Program’ जाहीर केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत यूजर्सना तब्बल 130GB फ्री डेटा दिला जात आहे. विशेष बाब म्हणजे ग्राहक हा 130GB डेटा पूर्ण वर्षभर वापरू शकतात. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, ईशान्य आणि ओडिशा वगळता भारतातील सर्व सर्कल्समधील युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.
VI Guarantee Program मध्ये पुढीलप्राणे भाग घ्या.
- VI Guarantee Program मध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्या VI नंबरवर 239 रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांचा डेली डेटा अमर्यादित प्लॅन ऍक्टिव्हेट केला पाहिजे.
- वर सांगितल्याप्रमाणे, रिचार्ज प्लॅन तुमच्या नंबरवर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही या प्रोग्रामसाठी पात्र आहात.
- आता तुम्हाला तुमच्या VI नंबरवरून 121199 किंवा 199199# डायल करावे लागेल.
- हा नंबर डायल केल्याबरोबर तुमच्या अकाउंटमध्ये 10GB डेटा क्रेडिट होईल, असे सांगितले जात आहे.
खरं तर, कंपनी दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये 10GB मोफत डेटा क्रेडिट करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही प्रक्रिया 13 महिने सतत सुरू राहील. यामध्ये कंपनी तुम्हाला दर महिन्याच्या 28 तारखेला 10GB डेटा देईल. अशाप्रकारे, या योजनेअंतर्गत तुम्हाला तब्बल 130GB डेटा मोफत मिळणार आहे. लक्षात घ्या की, तुमचा सध्याचा दैनिक डेटा कोटा संपल्यावरच तुम्ही हा 10GB डेटा वापरण्यास सक्षम असाल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile