Vodafone Idea ने नुकतेच इंटरनॅशनल रोमिंग पॅक लाँच केले आहेत. त्यानंतर, आता परत कंपनीने एक नवा दीर्घकालीन प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन खास अशा ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, ज्यांना संपूर्ण तीन महिन्यांच्या दीर्घ वैधतेसह ऑनलाइन स्ट्रीमिंगचा लाभ घ्यायला आवडेल. या प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात.
Vodafone Idea (Vi) च्या या नव्या प्लॅनची किंमत 902 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण 90 दिवसांपर्यंत वैधता मिळते. तसेच, हा प्लॅन कंपनीच्या साईटवर 'Unlimited' टॅब अंतगर्त सूचिबद्ध आहे.
प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. 90 दिवसांच्या वैधतेनुसार या प्लॅन वापरकर्त्यांना एकूण 180GB डेटा मिळणार आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMSअशा सुविधा मिळतात. OTT फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना SunNXT चे मोफत सबस्क्रिप्शन तीन महिन्यांच्या वैधतेसह प्लॅनमध्ये मिळेल. या स्ट्रीमिंग सेवेमध्ये, तुम्हाला तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषांमधील अनेक चित्रपट आणि शो बघायला मिळतात.
प्लॅनमधील इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या रिचार्ज प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि नाईट डेटा फायदे देखील उपलब्ध आहेत. हे फायदे केवळ VI रिचार्जमध्येच तुम्हाला मिळतील. दरम्यान लवकरच VI चे 5G नेटवर्क लाँच होणार असल्याच्या चर्चा टेक विश्वात रंगल्या आहेत.