Vodafone idea ने वैधता वाढवण्यासाठी लॉन्च केला Rs 24 चा मिनिमम प्रीपेड रिचार्ज
वोडाफोन आईडिया ने आपल्या यूजर्स साठी Rs 24 चा एक प्रीपेड रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे, पण हा प्लान फक्त वैधता वाढवण्याच्या हेतूने लॉन्च केला गेला आहे. याचा अर्थ असा आहे कि तुम्ही या प्लानच्या मदतीने 28 दिवसांची वैधता मिळवू शकता.
काही दिवसांपूर्वी आपण बघितले होते कि कंपनी ने एक नवा नियम आणला होता कि जर एखाद्या यूजरला आपला सिम डीएक्टिवेट होऊ द्यायचा नसेल तर त्याला कमीत कमी आपल्या अकाउंट मध्ये Rs 35 ठेवावे लागतील. असे न केल्यास तुमचे सिम बंद होऊ शकते. पण वोडाफोन आणि आईडिया ने एक नवा प्लान लॉन्च केला आहे, जो या नियमसाठी योग्य आहे.
विशेष म्हणजे वोडाफोन आईडिया कडे आधीपासूनच Rs 35 आणि Rs 65 मध्ये येणारे दोन प्लान्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्लानची वैधता वाढवू शकता, पण कंपनी तेवढ्यावरच थांबली नाही. कंपनी ने एक नवीन आणि खूप स्वस्त प्लान लॉन्च केला आहे, जो मात्र Rs 24 मध्ये येतो आणि याच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्लानची वैधता 28 दिवस वाढवू शकता.
हा नवा प्रीपेड रिचार्ज प्लान त्या सर्व यूजर्स साठी खूप चांगला आहे, ज्यांना फक्त आपल्या प्लानची वैधता वाढवण्यासाठीच एक प्लान हवा आहे. जेणेकरून त्यांचा नंबर बंद होऊ नये. वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही या प्लानच्या माध्यमातून आपल्या अकाउंटची वैधता अजून 28 दिवसांनी वाढवू शकता.
त्याचबरोबर, वोडाफोन इंडिया ने एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान कंपनी ने Rs 396 मध्ये लॉन्च केला आहे. तसेच यात तुम्हाला जे बेनिफिट मिळत आहेत ते Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान प्रमाणेच आहेत. विशेष म्हणजे वोडाफोन आपल्या या नवीन प्लान मध्ये तुम्हाला 1.4GB डेटा संपूर्ण 69 दिवसांसाठी देत आहे. हे जे काही या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे, ते Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लानशी मिळते जुळते आहे.
याव्यतिरिक्त या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉलिंग मिळतेच, सोबतच यात तुम्हाला 100 SMS प्रतिदिन मिळतात. तसेच तुम्हाला वोडाफोन प्ले चे सब्सक्रिप्शन पण दिले जात आहे. आइडियाच्या एका प्लान बद्दल बोलायचे तर, कंपनी ने एक Rs 392 मध्ये येणार प्रीपेड प्लान लॉन्च केला होता, जो 60 दिवसांच्या वैधतेसह येतो.