Vodafone Idea ग्राहकांसाठी मोठा निर्णय, कंपनीने सिम कार्डसाठी केली महत्वाची घोषणा!
Vodafone-Idea नवीन पॉलिसी लाँच केली आहे.
कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी सेल्फ-KYC प्रक्रिया सुरू केली आहे.
ग्राहक घरी बसून स्वतःसाठी नवीन सिम ऑर्डर करू शकतात.
Vodafone Idea News: ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी सेल्फ-KYC प्रक्रिया सुरू केली आहे. उद्योगातील अशा प्रकारची ही पहिलीच टेलिकॉम कंपनी आहे, जी आपल्या वापरकर्त्यांना अशी सुविधा देत आहे. सेल्फ-केवायसी प्रक्रिया अशा ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल जे नवीन Vi सिम घेण्याची योजना आखत आहेत. Vi चे नवीन सिम घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या जवळच्या दुकानात जाण्याची गरज नाही, ग्राहक घरी बसून स्वतःसाठी नवीन सिम ऑर्डर करू शकतात. नवीन सेल्फ-केवायसी प्रक्रियेशी संबंधित तपशील बघुयात-
हे सुध्दा वाचा : Flipkart वरील प्रचंड सवलतीनंतर अतिशय कमी किमतीत खरेदी करा Apple AirPods Pro
मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की, Vodafone-Idea कंपनीने ही नवीन Self-KYC प्रक्रिया केवळ 2 मंडळांमध्ये सुरू केली आहे. कर्नाटक आणि कोलकाता या दोन मंडळांमध्ये त्याची सुरुवात झाली आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत ही सेवा सर्व मंडळांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, ही प्रक्रिया केवळ पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन सेल्फ-KYC प्रक्रिया अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल, जे VI कंपनीकडून नवीन सिम घेणार आहेत. या प्रक्रियेचा वापर करून, ते स्वत: घरी बसून Vi चे नवीन सिम ऑर्डर करू शकतात. कसे ते जाणून घेऊयात-
– सर्वप्रथम, ग्राहकाला व्होडाफोन आयडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर त्यांना क्रमांक निवडावा लागेल आणि दुसऱ्या क्रमांकाद्वारे OTP प्रमाणीकरण करून त्यांची ऑर्डर द्यावी लागेल.
– यानंतर ग्राहकाला सेल्फ-केवायसीमध्ये दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, ज्यामध्ये आधार प्रमाणीकरण इ. गोष्टी आहेत.
– आता ग्राहकाला लाइव्ह फोटो आणि 10 सेकंदाचा व्हिडिओ घ्यावा लागेल.
– यानंतर तुमची ऑर्डर दिली जाईल आणि तुमचे डिजिटल व्हेरिफिकेशनही पूर्ण होईल. काही दिवसांनी तुम्हाला नवीन सिम तुमच्या घरी डिलिव्हरी मिळेल. मात्र, होम डिलिव्हरीच्या वेळी OTP प्रमाणीकरण देखील पूर्ण करावे लागेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile