भारतीय टेलिकॉम ऑपरेटर आपले प्रीपेड सब्सक्राइबर्स टिकवून ठेवण्यासाठी सतत काही नवीन प्लान्स लॉन्च करत आहेत. कंपन्या अनेक मिनिमम रिचार्ज पण ऑफर करत आहेत ज्या 28 दिवसांच्या वैधते सह येतात तर काही वार्षिक वैधतेसह येणारे मिनिमम प्लान्स पण आहेत जे डेटा आणि कॉल्स ऑफर करतात. वोडाफोन आईडिया ने अलीकडेच Rs 1,699 मध्ये वार्षिक प्लान सादर केला होता आणि आता कंपनीने अजून एक वार्षिक प्लान लॉन्च केला आहे ज्याची किंमत Rs 1,999 ठेवण्यात आली आहे.
या प्लानची वैधता 365 दिवस आहे. या प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 1.5GB 2G/3G/4G डेटा मिळतो आणि डेटा लिमिट पूर्ण होताच यूजर्स 50 पैसा प्रति MB दराने हाई-स्पीड डेटा वापरू शकतात.
यूजर्सना या प्लान मध्ये कोणत्याही FUP लिमिट विना अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्स पण मिळत आहेत. तसेच, प्लान मध्ये प्रतिदिन 100 SMS चा फायदा मिळत आहे. हा प्लान वोडाफोन आणि आईडिया सेलुलर दोन्ही सब्सक्राइबर्स साठी आहे आणि रिपोर्टनुसार हा प्लान फक्त केरळ सर्कल मध्ये सादर केला गेला आहे.
Vodafone ने अलीकडेच Rs 119 मध्ये नवा प्लान सादर केला आहे जो फक्त कंपनीच्या 4G सर्कल्स मध्ये उपलब्ध आहे. तसेच आईडिया सेलुलर पण आपल्या काही सर्कल्स जसे कि आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि केरळ इत्यादी मध्ये Rs 119 चा प्लान सादर करत आहे. यूजर्सना या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी 1GB डेटा दिला जातो. वोडाफोनच्या या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे आणि कोणतीही FUP लिमिट यात नाही.