Vodafone Idea भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. VI कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. आता देखील कंपनीने काही नवीन प्लॅन लाँच केले आहेत. होय, VI ने 1,111 रुपये, 1,112 रुपये आणि 4,219 रुपयांचे रिचार्ज लाँच केले आहेत. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर हे प्लॅन्स इतर श्रेणीमध्ये सूचीबद्ध केले आहेत. महत्त्वाचे लक्षात घ्या की, पुढील प्लॅन्स फक्त Vi One Fiber प्लॅनसोबत वापरता येतील. चला तर मग जाणून घेऊयात या रिचार्जमध्ये उपलब्ध असलेले बेनिफिट्स.
हे सुद्धा वाचा: डेली 1GB डेटासह Jio च्या सर्व प्लॅन्सची यादी, मिळेल Unlimited कॉलिंग आणि इतर अप्रतिम बेनिफिट्स। Tech News
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, 100 SMS सोबत 90 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच, मोफत अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. याशिवाय, प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. यात, SonyLiv सबस्क्रिप्शन, Zee5 सबस्क्रिप्शन आणि Hotstar सबस्क्रिप्शनसारखे अनेक OTT बेनिफिट्स देखील मोफत दिले जात आहेत. याशिवाय, रिचार्जमध्ये अतिरिक्त फायदे म्हणून Binge All Night, Weekend Data Rollover, Vi Movies आणि TV इ. सुविधा देखील मिळतील.
दुसऱ्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूंण 90 दिवसांची वैधता मिळणार आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, 100 SMS मिळतील. त्याबरोबरच, अमर्यादित कॉलिंगचे फायदे देखील मिळणार आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये SonyLiv सबस्क्रिप्शन, Zee5 सबस्क्रिप्शन आणि Hotstar सबस्क्रिप्शन सारखे अनेक OTT फायदे मोफत दिले जात आहेत. एवढेच नाही तर, अतिरिक्त फायदे म्हणून Binge All Night, Weekend Data Rollover, Vi Movies आणि TV इ. उपलब्ध आहेत.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण 365 दिवसांची वैधता मिळत आहे. प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, 100 SMS सह अमर्यादित कॉलिंगचा लाभ मळेल. याशिवाय प्लॅनमध्ये SonyLiv सबस्क्रिप्शन, Zee5 सबस्क्रिप्शन आणि Hotstar सबस्क्रिप्शन सारखे अनेक OTT बेनिफिट्स मोफत दिले जात आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात Binge All Night, Weekend Data Rollover, Vi Movies आणि TV इत्यादी मोफत ऍक्सेस उपलब्ध आहेत.
जर तुम्हाला या प्लॅन्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही VI च्या अधिकृत वेबसाईटला किंवा App ला भेट द्या.