खाजगी क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडिया ने आपला नवीन प्लान यूजर्स साठी सादर केला आहे. हा पोस्टपेड प्लान 649 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे आणि यात तुम्हाला 90GB डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग मिळत आहे. तसेच वोडाफोन आईडिया ने आयफोन फॉरेवर स्कीम पण लॉन्च केली आहे, हि स्कीम फक्त वोडाफोन आईडियाच्या पोस्टपेड यूजर्स साठीच आहे.
सध्या सर्व सब्सक्राइबर्सना याचा अंदाज येऊ लागला आहे कि वोडाफोन आईडिया कडून त्यांना काही शानदार प्लान्स ऑफर केले जात आहेत आणि त्याचमुळे कंपनी ने एक नवीन प्लान पण सादर केला आहे. असे पण म्हणता येईल कि एकापेक्षा जास्त प्लान्स लॉन्च केले गेले आहेत. वोडाफोन आईडिया गेल्या काही दिवसांपासून आपल्या यूजर्सना सर्वात चांगल्या ऑफर्स देण्याचा प्रयत्न करत आहे. या आयफोन फॉरेवर प्रोग्रॅम बद्दल बोलायचे झाले तर जर तुमच्याकडे आयफोन असेल तर यापेक्षा चांगली डील तुम्हाला मिळणार नाही.
तुम्हाला तर माहितीच आहे कि आयफोन रिपेयर इत्यादी करण्यासाठी तुम्हाला खूप जासृ पैसे खर्च कर्वे लागतात. पण जर तुम्ही वोडाफोन आईडियाचा हा प्लान घेतलात तर तुम्हाला हा जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कि हा आयफोन फॉरेवर प्रोग्रॅम म्हणजे काय.
जर वोडाफोन आयडियाच्या यूजर्स साठी लॉन्च झालेल्या आयफोन फॉरेवर प्रोग्रॅम बद्दल बोलायचे झाले तर हे आयफोन रिप्लेसमेंट, रिपेर आणि अपग्रेड करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे. हा प्रोग्राम लॉन्च पण यासाठीच करण्यात आला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास जर तुमचा आयफोन 7 तुमच्याकडून काही कारणास्तव डॅमेज झाला आहे. तर तुम्हाला जवळपास Rs 8,000 स्क्रीन रिप्लेसमेंट साठी खर्च कर्वे लागतील, जर यात बॅक स्क्रीन असेल तर यासाठी तुम्हाला Rs 5,400 च्या आसपास खर्च करावे लागतील.
तसेच जर तुमच्या फोनचा कॅमेरा पण डॅमेज झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळपास Rs 2,500 खर्च कर्वे लागतील. त्यात जर तुम्हाला पावर बटण रिपेयर करायचे असेल तर त्यासाठी पण तुम्हाला जवळपास Rs 2,500 खर्च करावे लागू शकतात. जर याचा एकूण खर्च जर काढला तर कदाचित तुम्ही तुमचा फोन रिपेर पण करणार नाही.
पण चांगली बातमी अशी आहे कि जर तुम्ही वोडाफोन रेड किंवा निरवानाचे ग्राहक असाल आणि Rs 649 किंवा त्यावरील एखादा प्लान वापरत असाल तर या प्लान मध्ये तुम्हाला हि आयफोन फॉरेवर स्कीम मिळत आहे. या स्कीम अंतर्गत तुम्हाला इतका मोठा खर्च तर करावा लागणार नाही पण तुम्हाला फक्त Rs 2,000 सर्विस हँडलिंग फी म्हणून आणि त्यावरील GST द्यावा लागेल. याचाच अर्थ असा कि जर तुम्ही एक आयफोन यूजर असाल तर तुमच्यासाठी यापेक्षा चांगला प्लान असूच शकत नाही.