सध्या देशात टेलिकम दिग्गज रिलायन्स Jio आणि Airtel कडून 5G सेवा पुरवल्या जात आहेत. दरम्यान, आता Vodafone Idea ने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. कंपनीने 5G कनेक्टिव्हिटी रोलआउट करण्यासाठी योजना देखील आखली आहे. Vodafone Idea (VI) ने सोमवारी सांगितले की, ते पुढील 6 ते 9 महिन्यांत 5G सेवा सुरू करू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती-
Vodafone Idea चे मुख्य कार्यकारी म्हणजेच चीफ एक्सिक्युटीव्ह अक्षय मुंद्रा म्हणाले की, ”5G सेवा सुरू करणे हे लोकांकडून भांडवल उभारणीचे एक उद्दिष्ट आहे. एकदा निधी आला की, ते सुरू करण्याचे काम देखील सुरू होईल. मूंद्रा पुढे म्हणाले की, 5G रोलआउट कंपनीच्या एकूण कमाईच्या 40% भाग पुढील 24-30 महिन्यांत कव्हर करेल.” मात्र, यावेळी त्यांनी 5G सेवेसाठी निश्चित तारीख दिलेली नाही.
पुढे ते म्हणाले की, 5G रोलआउटसाठी 5,720 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 5G सेवा 6 ते 9 महिन्यांत ग्राहकांसाठी आणली जाईल, अशी शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Vodafone Idea ची 5G सेवा महाराष्ट्रातील पुणे आणि राजधानी दिल्लीच्या काही भागात आधीच सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, आता यापुढे या सर्विसचा विस्तार कुठून सुरु होईल. या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. “निधीअभावी कंपनी 5G सेवा सुरू करू शकलेली नाही”, असे देखील मुंद्रा यांनी सांगतले.
खरं तर, आपण सर्वांना माहितीच आहे की, 5G सेवा आणण्याची Vodafone Idea ची योजना भारतीय बाजारपेठेत आधीपासूनच मक्तेदारी असलेल्या रिलायन्स Jio आणि Airtel शी जबरदस्त स्पर्धा करणार आहे. सध्या Jio कडे सर्वाधिक ग्राहक आहेत, तर Airtel दुसऱ्या क्रमांकावर आहे. एवढेच नाही तर, Jio आणि Airtel आपल्या 239 रुपये आणि त्यावरील प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा ऑफर करतात. 5G च्या क्षेत्रात राहणारे पात्र ग्राहक या सेवेचा मनसोक्त लाभ देखील घेत आहेत.