Vodafone Idea च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. VI ने विशेषतः आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन 'Choice Plan' लाँच केले आहेत. यामध्ये यूजर्सना त्यांच्या गरजेनुसार अनेक फायदे निवडता येतात. आपल्या पोस्टपेड ग्राहकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने VI ने हा उपक्रम सुरू केला आहे. ही ऑफर आणणारी VI ही पहिली टेलिकॉम कंपनी आहे, जी वापरकर्त्यांना त्यांच्या गरजा आणि प्राधान्यांनुसार प्लॅन्ससह बेनिफिट निवडण्याची सुविधा देते.
पोस्टपेड प्लॅन्समध्ये आता पोस्टपेड वापरकर्ते मनोरंजन, खाद्यपदार्थ आणि प्रवास इत्यादींमध्ये त्यांच्या इच्छेनुसार फायदे निवडण्यास सक्षम असतील. चला तर मग नव्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती बघुयात.
Vodafone Idea त्याच्या नवीन चॉईस प्लॅनअंतर्गत वैयक्तिक आणि कौटुंबिक पोस्टपेड वापरकर्त्यांना चार विशिष्ट श्रेणींमध्ये त्यांच्या पसंतीच्या प्रीमियम भागीदाराकडून लाभ निवडण्याची सुविधा देत आहे. स्मार्टफोनसाठी Entertainment, Food, Travel आणि सेफ्टी या चार श्रेणींचा समावेश आहे. म्हणजेच हे स्पष्ट आहे की, त्यांना त्यांच्या प्लॅनसह या श्रेणींमध्ये कोणते फायदे मिळवायचे आहेत. हे संपूर्ण आता पोस्टपेड वापरकर्त्यांवर अवलंबून आहे.
> Entertainment: वापरकर्त्यांना Amazon Prime, Disney + Hotstar, SonyLiv आणि SunNXT चा पर्याय मिळत आहे.
> Food: यामध्ये EazyDiner चे सहा महिन्यांचे सदस्यत्व समाविष्ट आहे, जे बार आणि प्रीमियम रेस्टॉरंटमध्ये 50% सूट देईल.
> Travel: यामध्ये तुम्ही एका वर्षासाठी EaseMyTrip चे मोफत सबस्क्रिप्शन मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला वन-वे फ्लाइट बुकिंगवर 400 रुपये आणि राउंड ट्रिप बुकिंगवर 750 रुपये सूट मिळेल.
> प्रगत सुरक्षा आणि हँडसेट अनुभवासाठी, स्मार्टफोनच्या सेफ्टी फीचर्स अंतर्गत Norton Anti चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
Vi Max वैयक्तिक प्लॅनमध्ये एकूण चार प्लॅन ऑफर करण्यात आले आहेत. यामध्ये कंपनी 401रुपये, 501 रुपये, 701 रुपये आणि 1101 रुपयांचे प्लान ऑफर करत आहे. तसेच , वरील सर्व फायदे Max Individual प्लॅन तसेच 601 रुपये, 1001 रुपये आणि 1151 रुपयांच्या VI मॅक्स फॅमिली प्लॅनमध्ये उपलब्ध असतील.