Vodafone Idea ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. तर, Jio आणि Airtel कंपन्या अजूनही VI ला टक्कर देतात. मात्र, आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी VI देखील मागे राहिलेली नाही. असे अनेक प्लॅन्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला अप्रतिम बेनिफिट्स मिळतात, जे इतर कंपन्या ऑफर करत नाही. दरम्यान, Vi अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा जास्त प्लॅन घेऊन येत आहे. जर तुम्ही VI ग्राहक असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
Vodafone Idea (Vi) च्या सर्वात स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची किंमत फक्त 1,799 रुपये आहे. तर, Jio आणि Airtel कंपनी 2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 1 वर्षाची म्हणजेच 365 दिवसांची वैधता देतात. तर Vodafone Idea (Vi) वापरकर्त्यांना केवळ 1,799 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण एका वर्षाची वैधता ऑफर करत आहे.
Vi च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना प्लॅनमध्ये 24GB डेटाचा प्रवेश मिळेल. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्ही संपूर्ण 1 वर्षासाठी अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. त्याबरोबरच, या प्लॅन अंतर्गत तुम्ही 3600SMS मोफत पाठवू शकता. डेटा कोटा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना प्रति MB 50 पैसे आकारले जातील.
प्लॅनमध्ये उपलब्ध इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुमच्या मनोरंजनाची संपूर्ण सोय करण्यात आलेली आहे. यात 5000 हून अधिक चित्रपट आणि शो असलेल्या Vi Movies आणि TV चा ऍक्सेस उपलब्ध आहे. त्याबरोबरच, वापरकर्ते या ॲपवर 200 हून अधिक टीव्ही चॅनेल ऍक्सेस करू शकतात. अलीकडेच कंपनीने सांगितले की, या ॲपमध्ये 13 हून अधिक OTT ॲप्सचा समावेश देखील करण्यात आला आहे.