Vodafone Idea कडे अनेक अप्रतिम बेनिफिट्ससह सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध
प्रसिद्ध OTT सब्स्क्रिप्शन्सचे बेनिफिट्ससह VI चे अप्रतिम प्लॅन्स
या यादीतील Vodafone Idea च्या सुरुवातीच्या प्लॅनची किंमत 95 रुपये आहे.
भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर Vodafone Idea कडे अनेक अप्रतिम बेनिफिट्ससह सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन्स आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, VI च्या सर्व प्लॅनमध्ये सुपर फास्ट डेटापासून ते डेटा रोलओव्हरपर्यंत बेनिफिट्स मिळतात. हे इतर कंपन्याही ऑफर करत नाही. यापैकी काही असे देखील प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये प्रसिद्ध OTT सब्स्क्रिप्शन्सचे बेनिफिट्स देखील मिळतात. एवढेच नाही तर, हे रिचार्ज प्लॅन्स तुम्हाला कमी किमतीत ऑफर केले जातात. पाहुयात किंमत-
Vodafone Idea चा 95 रुपयांचा प्लॅन
या यादीतील Vodafone Idea च्या सुरुवातीच्या प्लॅनची किंमत 95 रुपये आहे. या प्लॅनमध्ये एकूण 4GB डेटा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, हा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. तर, या प्लॅनमध्ये उपलब्ध OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, 28 दिवसांसाठी Sony Liv सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.
Vodafone Idea चा 151 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या 151 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. डेटा वापरासाठी तुम्हाला यात 4GB डेटा मिळणार आहे. यामध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी, प्रसिद्ध आणि लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Disney+Hotstar चे सबस्क्रीप्शन 3 महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. यासह तुम्ही तुमचे आवडते शोज आणि चित्रपटांचा आस्वाद सहज घेऊ शकता.
Vodafone Idea चा 169 रुपयांचा प्लॅन
VI च्या 169 रुपयांचा प्लॅनमध्ये देखील Disney+Hotstar सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी मोफत दिले जात आहे. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 8GB डेटा उपलब्ध आहे. VI च्या या प्लॅनची वैधता एकूण 30 दिवसांची आहे.
लक्षात घ्या की, टेलीकॉम कंपनी Vodafone Idea ने वरील सर्व प्रीपेड प्लॅन विशेषतः OTT प्रेमींसाठी कमी किमतीत लाँच केले आहेत. या सर्व प्लॅन्स सध्याच्या प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज केले जाऊ शकतात. त्याबरोबरच, हे सर्व एंटरटेन्मेंट प्लॅन्स ग्राहका अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे खरेदी करू शकतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.