VI चे आकर्षक प्लॅन्स! Affordable किमतीत मिळेल हाय-स्पीड इंटरनेट, Unlimited कॉलिंग आणि बरेच काही। Tech News
खाजगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये VI सर्वात कमी किमतीत आकर्षक बेनिफिट्ससह प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते.
ग्राहकांना रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट मिनिट बेनिफिट मिळतो.
तुम्हाला हाय-स्पीड डेटासह अमर्यादित कॉलिंग मिळेल.
Vodafone Idea कडे ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना खाजगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वात कमी किमतीत आकर्षक बेनिफिट्ससह प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते. Vodafone Idea कडे असे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, जे अतिशय कमी किमतीत येतात आणि ग्राहकांना दीर्घ वैधता देतात. होय, या लेखात आम्ही तुम्हाला 99 रुपये, 204 रुपये, 198 रुपये आणि 128 रुपयांच्या प्लंबद्दल माहिती देणार आहोत.
VI चा 99 रुपयांचा प्लॅन
जर आपण सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनची चर्चा केली जी 99 रुपयांच्या किंमतीत येते, तर हा प्लॅन वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या वैधतेसह येतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रानुसार 15 किंवा 28 दिवसांची वैधता मिळते. यात 200MB डेटा आणि 99 रुपयांचा टॉकटाइमही मिळतो.
VI चा 128 रुपयांचा प्लॅन
128 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 10 लोकल ऑन-नेट नाईट मिनिटे मिळतात, याशिवाय सर्व कॉलसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद आकारले जातात. आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्राहकांना रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट मिनिट बेनिफिट मिळतो. हा प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह येतो.
VI चा 198 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वैधता मिळते. वैधतेदरम्यान तुम्हाला 500MB डेटा दिला जातो. या व्यतिरिक्त ग्राहकांना या प्लॅनमध्ये 198 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळतो. या प्लॅनमध्ये कॉल चार्ज 2.5 पैसे प्रति सेकंद आहे.
VI चा 204 रुपयांचा प्लॅन
VI च्या 204 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना एक महिन्याची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये VI कॉलसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद आकारले जातील. ग्राहक त्यांचे सेकंडरी सिम सक्रिय ठेवण्यासाठी हे सर्व प्लॅन्स वापरू शकतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile