Vodafone Idea चा Best प्लॅन! दररोज 3GB डेटासह तब्बल 48GB डेटा मिळेल Free, वाचा डिटेल्स 

Vodafone Idea चा Best प्लॅन! दररोज 3GB डेटासह तब्बल 48GB डेटा मिळेल Free, वाचा डिटेल्स 
HIGHLIGHTS

Vodafone Idea VI चा 901 रुपयांचा प्लॅन अप्रतिम आहे.

कंपनी या प्लॅनमध्ये यूजर्सना 48GB अतिरिक्त डेटा देत आहे.

या प्लॅनमध्ये कंपनी 1 वर्षासाठी Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

Vodafone Idea (Vi) आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक रिचार्ज प्लॅन घेऊन येत आहे. तुम्ही Vi ग्राहक असल्यास, हा रिपोर्ट फक्त तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Vodafone Ideaच्या अशा प्लॅनची ​​माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये यूजर्सला 1GB, 2GB किंवा 2.5GB नाही तर दररोज 3GB डेटा दिला जातो. याशिवाय, प्लॅनमध्ये एक वर्षासाठी OTT चे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात या अप्रतिम प्लॅनची किंमत-

Vodafone Idea Vi top class recharge plans
Vodafone Idea Vi top class recharge plans

Vodafone Idea चा डेली 3GB डेटासह येणारा प्लॅन

Vodafone Idea VI च्या या प्लॅनची ​​किंमत 901 रुपये आहे. हा प्लॅन दीर्घकाळ वैधतेसह म्हणजेच 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. आम्ही सांगितल्याप्रमाणे हा प्लॅन वापरकर्त्यांना 1GB, 2GB किंवा 2.5GB नाही तर दररोज 3GB डेटाचा ऍक्सेस देतो. एवढेच नाही तर, कंपनी या प्लॅनमध्ये यूजर्सना 48GB अतिरिक्त डेटा देत आहे. 70 दिवसांच्या वैधतेनुसार वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 258GB डेटाचा ऍक्सेस मिळेल.

बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, दररोज 100SMS ही पाठवले जाऊ शकतात. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये मनोरंजनाची सोय करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दीर्घकाळच्या वैधतेसह OTT सबस्क्रिप्शन मिळेल. होय, या प्लॅनमध्ये कंपनी 1 वर्षासाठी Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

Vodafone Idea Vi
Vodafone Idea

इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये नाईट डेटा आणि वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा समाविष्ट आहे. नाईट डेट अंतर्गत, मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मोफत अमर्यादित डेटा वापरता येतो. तर वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये युजर्स सोमवार ते शुक्रवारचा उर्वरित डेटा शनिवार आणि रविवारी वापरू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्ही विशेष बेनिफिट्स तुम्हाला फक्त Vodafone Idea च्या प्लॅन्समध्ये मिळतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo