Vodafone Idea चा धमाकेदार प्लॅन! 90 रुपयांपेक्षा कमी किमतीत भरपूर डेटा आणि लोकप्रिय OTT सबस्क्रिप्शन Free
Vodafone Idea चा 82 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला आकर्षक बेनिफिट्स मिळतात.
Vodafone Idea चा 82 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला 4GB डेटा मिळेल.
प्लॅनमध्ये Sony Liv मोबाईल सबस्क्रिप्शनची वैधता 28 दिवसांची असेल.
Vodafone Idea भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर आहे, जी ग्राहकांना आपल्या प्लॅन्समध्ये नेहमीच आकर्षक ऑफर्स देत असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी ग्राहकांना OTT सबस्क्रिप्शन आणि मोबाईल डेटा दोन्ही सुविधा फक्त 82 रुपयांमध्ये ऑफर करत आहे. लक्षात घ्या की, हा एक प्रीपेड प्लॅन आहे, जो खरं तर एक डेटा व्हाउचर आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात Vodafone Idea च्या 82 रुपयांच्या प्लॅनचे सविस्तर बेनिफिट्स-
Vodafone Idea चा 82 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea चा 82 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी एकूण 4GB डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता एकूण 14 दिवसांची आहे. वैधतेदरम्यान तुम्ही 4GB डेटा कधीही वापरू शकता. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले OTT सबस्क्रिप्शन SonyLIV मोबाइल आहे. Sony Liv मोबाईल सबस्क्रिप्शनची वैधता 28 दिवसांची असेल. त्यामुळे, जरी डेटा तुम्हाला केवळ 14 दिवस वापरता येईल तरीही OTT सदस्यता 28 दिवस टिकणार आहे.
SonyLIV सबस्क्रिप्शन- SonyLIV सबस्क्रिप्शनसह वापरकर्ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आवडते टीव्ही शो आणि चित्रपट पाहू शकतात. त्याबरोबरच, वापरकर्ते जाहिरातमुक्त सामग्री म्हणजेच ऍड-फ्री कंटेंट पाहण्यास सक्षम असतील. पॅकसह रिचार्ज केल्यास वापरकर्त्यांना SMS मध्ये एक लिंक मिळेल, ज्याद्वारे ते SonyLIV प्रीमियमचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, हा प्लॅन सेवा वैधता देत नाही. हा प्लॅन ऍक्टिव्ह सर्व्हिस व्हॅलिडिटी प्लॅनसह रिचार्ज केला जाऊ शकतो. Vodafone Idea चे इतर प्रीपेड प्लॅन देखील आहेत, जे Sony Liv सबस्क्रिप्शन प्लॅनसह येतात. त्यात 369 रुपये, 698 रुपये आणि 903 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. त्याबरोरबच, 698 रुपये, 369 रुपये आणि 903 रुपयांचा डेटा व्हाउचरदेखील उपलब्ध आहे. याशिवाय Vi च्या पोर्टफोलिओमध्ये पोस्टपेड प्लॅन्स देखील आहेत, जे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय SonyLIV चा ऍक्सेस देतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile