Good News! Vodafone Ideaची 5G सर्व्हिस अखेर भारतातील दोन शहरांमध्ये लाँच, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सेवा सुरु। Tech News 

Good News! Vodafone Ideaची 5G सर्व्हिस अखेर भारतातील दोन शहरांमध्ये लाँच, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सेवा सुरु। Tech News 
HIGHLIGHTS

तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Vodafone-Idea ने देखील आपली 5G सेवा सुरू केली आहे.

'महाराष्ट्रातील पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी 5G सर्व्हिस सुरु

वापरकर्ते 5G रेडी सिमच्या मदतीने हाय स्पीड इंटरनेट वापरण्यास सक्षम असतील.

Airtel आणि Reliance Jio नंतर आता देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Vodafone-Idea ने देखील आपली 5G सेवा सुरू केली आहे. आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी कंपनीने सध्या भारतातील दोन शहरांच्या काही भागात आपली 5G सेवा सुरू केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. मात्र, लक्षात घ्या की, Vodafone idea ने अद्याप असे कोणतेही विधान अधिकृतपणे जारी केलेले नाही.

भारतातील ‘या’ दोन शहरांमध्ये VI 5G सर्व्हिस लाँच

”महाराष्ट्रातील पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी 5G Live सह भारतातील Vi 5G नेटवर्कची क्षमता अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.” असे अधिकृत वेबसाईटच्या फुटर सेक्शनमध्ये म्हटले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की वेबसाइटनुसार, वापरकर्ते 5G रेडी सिमच्या मदतीने हाय स्पीड इंटरनेट वापरण्यास सक्षम असतील.

VODAFONE IDEA

त्याबरोबरच, इंडियन मोबाइल काँग्रेसच्या सातव्या एडिशनमध्ये Vodafone Idea चे प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला यांनी माहिती दिली होती की, गेल्या वर्षी व्होडाफोन आयडिया टीमने 5G लाँच करण्यासाठी कोअर नेटवर्कवर बरेच काम केले आहे आणि येत्या तिमाहीत कंपनी लवकरच 5G रोलआऊटसाठी लक्षणीय गुंतवणूक करणार आहे.

IMC 2023 मधील VI च्या घोषणा

कंपनीने IMC 2023 मध्ये IoT, 5G, क्लाउड आणि इतर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले होते, ज्यात Vi C-DOT IoT लॅब, स्मार्ट कनेक्टिव्हिटी टेस्ट बेड, Vi AirFiber, Vi Games, Cloud Play, VR Games आणि XR Edutech इ. हे सोल्युशन मुख्यतः 5G नेटवर्कवर आधारित होते.

Vodafone-Idea ने या वर्षाच्या सुरुवातीला घोषणा केली होती की, कंपनीने आपल्या ग्राहकांना 5G सेवा देण्यासाठी अनेक आघाडीच्या OEM सह भागीदारी केली आहे. Vodafone-Idea ने लिलावात 5G स्पेक्ट्रम विकत घेतला आणि नवीन नेटवर्कसाठी आपल्या प्लॅन्सची माहिती देखील दिली होती.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo