Vodafone Idea 5G Launched: अखेर VI ची 5G सर्व्हिस भारतातील 17 शहरांमध्ये लाईव्ह! तुमचे शहर आहे का यादीत?

Updated on 16-Dec-2024
HIGHLIGHTS

Vodafone Idea (VI) ने अखेर आपल्या ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केली.

आता कंपनीने 17 परवानाधारक सेवा क्षेत्रांमध्ये निवडक ठिकाणी आपली फास्टेस्ट 5G सर्व्हिस सुरू केली.

महाराष्ट्रातील दोन शहरांचा या यादीत समावेश आहे.

Vodafone Idea 5G Launched: भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea च्या 5G सर्व्हिसची प्रतीक्षा दिर्धकाळापासून भारतात सुरु होती. अखेर आता VI युजर्सची प्रतीक्षा संपली आहे. Vodafone Idea (Vi) ने अखेर आपल्या ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केली आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर कंपनीने आपल्या ग्राहकांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अहवालानुसार भारतातील 17 परवानाकृत सेवा क्षेत्रांमध्ये (LSAs) 5G सेवा सुरू करण्यात आली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या शहरांतील अनेक ठिकाणांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजेच VI च्या अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनसह ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

Vodafone Idea 5G Launched

Vodafone Idea 5G

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, प्रसिद्ध प्रकाशक TelecomTalk च्या ताज्या अहवालानुसार Vodafone Idea ने अखेर आपल्या ग्राहकांसाठी 5G सर्व्हिस सुरू केली आहे. लक्षात घ्या की, कंपनी मार्च 2025 पर्यंत व्यावसायिकरित्या 5G सेवा रोलआउट करेल. तर, आता कंपनीने 17 परवानाधारक सेवा क्षेत्रांमध्ये निवडक ठिकाणी आपली फास्टेस्ट 5G सर्व्हिस सुरू केली आहे.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, या सेवेत प्रवेश करण्यासाठी, वोडाफोन आयडियाच्या प्रीपेड ग्राहकांना 475 रुपयांचा प्लॅन ऍक्टिव्ह करणे आवश्यक आहे. तर, कंपनीच्या पोस्टपेड ग्राहकांना 1101 रुपयांचा प्लॅन ऍक्टिव्ह करावा लागेल. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!

Vodafone Idea 5G शहरांची यादी

  • 1. दिल्ली: ओखला इंडस्ट्रियल एरिया फेज 2, इंडिया गेट, प्रगती मैदान.
  • 2. कोलकाता: सेक्टर-5 आणि सॉल्ट लेक.
  • 3. राजस्थान: जयपूर गॅलेक्सी सिनेमा, मानसरोवर औद्योगिक क्षेत्र, RIICO.
  • 4. मुंबई: वरळी, मरोळ अंधेरी पूर्व
  • 5. महाराष्ट्र: पुणे- शिवाजी नगर
  • 6. आंध्र प्रदेश: हैदराबाद- एडा उपल, रंगा रेड्डी
  • 7. गुजरात: अहमदाबाद- दिव्य भास्कर जवळ, कॉर्पोरेट रोड, मकरबा, प्रल्हाद नगर
  • 8. उत्तर प्रदेश पूर्व: लखनौ- विभूती खंड, गोमती नगर
  • 9. उत्तर प्रदेश: आग्रा- जेपी हॉटेल जवळ, फतेहाबाद रोड
  • 10. मध्य प्रदेश: इंदूर – इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स, परदेशीपुरा
  • 11. बिहार: पाटणा- अनिशाबाद गोलांबर
  • 12. पंजाब: जालंधर- कोट कलान
  • 13. कर्नाटक: बेंगळुरू- डेअरी सर्कल
  • 14. पश्चिम बंगाल
  • 15. केरळ: थ्रीक्काकडा, काकनाड
  • 16. हरियाणा: कर्नाल- HSIIDC, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 3
  • 17. पंजाब: जालंधर- कोट कलान

5G सर्व्हिसेस

भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Airtel आणि Jio ची 5G सर्व्हिस दोन वर्षांपूर्वी लाँच केली गेली. त्यानंतर, या दोन्ही कंपन्यांचे फास्टेस्ट नेटवर्क जवळपास संपूर्ण भारतात पसरले आहे. दरम्यान, भारतातील तिसऱ्या मोठ्या टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने देखील नवी 5G सर्व्हीस लाँच केली आहे. एवढेच नाही तर, भारतातील एकमेव दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL च्या 4G आणि 5G सेव्हीसेबद्दल अनेक वृत्त पुढे आले आहेत. यावरून या सेवा देखील लवकरच ग्राहकांसाठी रोल आऊट केले जातील, अशी मोठ्या प्रमाणात शक्यता आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :