VI 5G Plans: कंपनीने लाँच केले नवे Best प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स, जाणून घ्या किंमत आणि फायदे। Tech News 

VI 5G Plans: कंपनीने लाँच केले नवे Best प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स, जाणून घ्या किंमत आणि फायदे। Tech News 
HIGHLIGHTS

Vodafone Idea कडून आता आपल्या 5G रिचार्ज प्लॅनची ​​घोषणा

पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी VI 5G सेवा लाईव्ह

VI ने पोस्टपेड आणि प्रीपेड या दोन्ही श्रेणीमध्ये नवे प्लॅन्स लाँच केले.

भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Airtel आणि Reliance Jio च्या 5G सेवेच्या आगमनानंतर, अलीकडेच Vodafone Idea ने दोन शहरांमध्ये 5G सेवा लाईव्ह करण्याची घोषणा त्यांच्या साइटवर केली होती. दरम्यान ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, Vodafone Idea ने आता आपल्या 5G रिचार्ज प्लॅनची ​​घोषणा देखील केली आहे. होय, VI ने पोस्टपेड आणि प्रीपेड या दोन्ही श्रेणीमध्ये नवे प्लॅन्स लाँच केले आहे. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात की, कोणत्या प्लॅनसह कंपनी वापरकर्त्यांना 5G वेगाने डेटा प्रदान करत आहे आणि कोणत्या ठिकाणी VI 5G सर्व्हिसचा लाभ घेता येईल.

‘या’ ठिकाणी VI 5G सर्व्हिस LIVE

“पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी 5G Live सह भारतातील Vi 5G नेटवर्कची क्षमता अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.” असे VI च्या अधिकृत साईटवर अलीकडेच सांगण्यात आले आहे. वेबसाइटनुसार, वापरकर्ते 5G रेडी सिमच्या मदतीने हाय स्पीड इंटरनेट वापरण्यास सक्षम असतील.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, सध्या Vodafone Idea च्या 5G सेवा महाराष्ट्रातील पुणे (शिवाजी नगर) आणि दिल्लीतील इंडिया गेट/प्रगती मैदान या निवडक भागात उपलब्ध आहेत.

vodafone idea VI Data Prepaid Plan
vodafone idea 5G Data Prepaid Plan

Vi 4G सिमवर 5G सेवा उपलब्ध?

Jio आणि Airtel प्रमाणे Vodafone Idea च्या वापरकर्त्यांना देखील 5G सेवा वापरण्यासाठी दुसरे सिम घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच तुम्ही 4G सिमसह बिंदास 5G स्पीडचा आनंद घेऊ शकता.

VI 5G प्रीपेड प्लॅन

जर तुमच्याकडे Vodafone Idea चे प्रीपेड सिम असेल आणि तुम्हाला कंपनीच्या 5G स्पीडचा आनंद घ्यायचा असेल, तर कंपनीचे म्हणणे आहे की, यासाठी यूजरला VI 475 प्लॅन घ्यावा लागेल. खरं तर, VI चा 475 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. विशेषतः प्लॅनमध्ये तुम्हाला भरपूर डेटा मिळतो. होय, या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यामध्ये ग्राहकांना संपूर्ण वैधतेसाठी दररोज 4GB डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनसह 28 दिवसांत तुम्हाला एकूण 112GB डेटा मिळेल.

VI 5G पोस्टपेड प्लॅन

जर तुम्ही VI कंपनीचे पोस्टपेड यूजर असाल तर तुम्हाला 5G सेवेसाठी REDX 1101 प्लॅन घ्यावा लागेल. सुरुवातीला, ज्या वापरकर्त्याला 5G सेवेचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी दिल्ली किंवा महाराष्ट्रातील पुणे शहरात त्यांचा नंबर नोंदवला पाहिजे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo