Vodafone Idea 5G: कंपनीची बहुप्रतीक्षित सर्विस भारतात 6 महिन्यांत होणार सुरु, जाणून घ्या संपूर्ण तपशील। Tech News 

Vodafone Idea 5G: कंपनीची बहुप्रतीक्षित सर्विस भारतात 6 महिन्यांत होणार सुरु, जाणून घ्या संपूर्ण तपशील। Tech News 
HIGHLIGHTS

Vodafone Idea VI ने देखील हळू हळू आपल्या 5G सर्व्हिसचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.

VI चे सध्या भारतात 228 दशलक्ष वापरकर्ते आहेत.

Vodafone Idea येत्या 6-7 महिन्यांत अधिकृतपणे देशात 5G सेवा सुरू करेल.

Airtel आणि रिलायन्स Jio ने आधीच देशात 5G नेटवर्क सुरु करून त्यांच्या ग्राहकांना आनंदित केले आहे. त्यानंतर बऱ्याच काळानंतर, देशातील तिसरी टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea VI ने देखील हळू हळू आपल्या 5G सर्व्हिसचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vodafone idea (VI) लवकरच देशात 5G सेवा लाईव्ह करण्याची योजना आखत आहे. अलीकडेच आलेल्या अहवालानुसार, दूरसंचार नेटवर्क येत्या 6-7 महिन्यांत अधिकृतपणे देशात 5G सेवा सुरू करेल. VI च्या टेलिकॉम नेटवर्कची सध्या मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे टेस्टिंग सुरू आहे.

Vi 5G 2024 च्या अखेरीस LIVE होण्याची शक्यता

2024 च्या अखेरीस VI 5G सेवा सुरू करेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. कंपनीने आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मुंबई, पंजाब, राजस्थान, हरियाणा यासह भारतातील 17 मंडळांमध्ये 5G स्पेक्ट्रम वाटप सुरक्षित केले आहे. तसेच, कर्नाटक, केरळ, कोलकाता, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश (पूर्व) (पश्चिम), आणि पश्चिम बंगालमध्ये ही सेवा लवकरात लवकर सुरु होईल. मुंबई आणि पुण्यातील काही वापरकर्त्यांना आधीच VI 5G नेटवर्कचे ऍक्सेस आहे.

vodafone idea Vi 5G

Vodafone Idea 5G

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुंद्रा म्हणतात की, “अधिकृत लाँच होण्यापूर्वी VI ला 5G च्या कमाईबाबत स्पष्टता हवी आहे. अक्षय मुंदडा यांनी मंगळवारी तिसऱ्या तिमाहीच्या कमाई कॉल दरम्यान आपल्या इन्वेस्टर्सना सांगितले की, कंपनी 5G रोलआउटला अंतिम रूप देण्यासाठी विविध उद्योग भागीदारांशी चर्चा करत आहे.” आम्ही तुम्हाला सांगतो की, Vi ची 3G सेवा बंद करण्याची आणि 4G कव्हरेज सुधारण्यासाठी बँडविड्थ वापरण्याची योजना सुरु आहे.

लक्षात घ्या की, VI ने अलीकडेच Amazon Prime Video आणि Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह नवीन वार्षिक प्लॅन्स लाँच केले आहेत. ज्या Jio आणि Airtel च्या समान प्लॅनपेक्षा स्वस्त आहेत. VI चे सध्या भारतात केवळ 228 दशलक्ष वापरकर्ते आहेत. परंतु अनुक्रमे 449 आणि 277 दशलक्ष वापरकर्ते असलेल्या Airtel किंवा Jio ची निवड केल्यामुळे VI युजर्सची संख्या कमी होत चालली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo