भारीच की! Vodafone Idea ने सर्वात स्वस्त 49 रुपयांचा प्लॅनमध्ये केले मोठे बदल, आता मिळेल भरपूर डेटा। Tech News
VI आपल्या प्लॅन्समध्ये अनेक आकर्षक फायदे ऑफर करते.
Vodafone Idea ने 49 रुपयांच्या प्लनमध्ये मोठे बदल केले आहेत.
ज्या ग्राहकांना 1GB किंवा 2GB नाही तर भरपूर डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन अगदी योग्य
Vodafone Idea (Vi) ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी अनेकदा आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स लाँच करते. विशेष म्हणजे VI आपल्या प्लॅन्समध्ये अनेक आकर्षक फायदे ऑफर करते, जे इतर कुठलीही टेलिकॉम कंपनी प्रदान करत नाही. यामध्ये वापरकर्त्यांना सर्वात कमी किमतीत चांगले फायदे मिळतात. याशिवाय, कंपनी आपल्या विद्यमान प्लॅन्सचे फायदे देखील बदलत राहते. आता पुन्हा एकदा Vi ने आपल्या विद्यमान स्वस्त प्लॅनपैकी एकाच्या फायद्यांमध्ये बदल केले आहेत. आता या प्लॅनमध्ये युजर्सना भरपूर डेटा मिळणार आहे.
Vodafone Idea चा 49 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea चा 49 रुपयांचा प्लॅन फक्त 1 दिवसाच्या वैधतेसह येतो. सकाळी हा प्लॅन सक्रिय करण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुम्ही दिवसभर योजनेअंतर्गत उपलब्ध फायदे मिळवू शकता. कारण या प्लॅन अंतर्गत उपलब्ध असलेले फायदे त्याच रात्री 11:59 वाजता कालबाह्य होतील. त्यामुळे, जर तुम्ही संध्याकाळी हा प्लॅन सक्रिय केला तरीही 11:59 PM लाच तुमचा प्लॅन एक्स्पायर होईल.
या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये यूजर्सला 1 दिवसासाठी 20GB डेटा मिळेल. डेटा व्यतिरिक्त Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे समाविष्ट नाहीत. या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग किंवा SMS ची सुविधा देखील मिळत नाही. ज्या ग्राहकांना एका दिवसासाठी फक्त 1GB किंवा 2GB नाही तर भरपूर डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन अगदी योग्य आहे. हा प्लॅन कमी किंमतीत संपूर्ण 20GB डेटा ऍक्सेस करू शकतो.
पूर्वी, Vodafone Idea चा 49 रुपयांचा प्लॅन वापरकर्त्यांना एकूण 2GB 4G डेटासह 14 दिवसांच्या वैधतेसह येत होता. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये 25SMS, अमर्यादित ऑन-नेट कॉलिंग आणि ऑफ-नेट आउटगोइंग कॉलसाठी 250 मिनिटे मिळत होती. त्याबरोबरच, वापरकर्ते Vodafone Idea ॲप्सच्या मोफत ऍक्सेस देखील होता.
Airtel आणि Jio चा 49 रुपयांचा प्लॅन
Airtel आणि Jio दोघांनी त्यांच्या प्रीपेड प्लॅन पोर्टफोलिओमध्ये 49 रुपयांच्या प्लॅन लाँच केला आहे. हे प्लॅन विशेषत: IPL सीझनसाठी सादर केले गेले आहेत, जे वापरकर्त्यांना भरपूर प्रमाणात डेटा ऑफर करतात. Airtel आणि Jio च्या या पार्श्वभूमीवर आता Vodafone Idea ने देखील सध्याच्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. आता हा प्लॅन वापरकर्त्यांना भरपूर डेटा देईल, ज्याद्वारे तुम्ही इंटरनेट अखंडितपणे वापरू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile