प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने अलीकडेच म्हणजे जुलै महिन्यात आपल्या प्लॅन्सच्या किमतीत दरवाढ केली. या दरवाढीचा ग्राहकांच्या खिशाला मोठा ताण बसलेला आहे. मात्र, युजर्स या निर्णयावर नाराज असताना कंपनीने युजर्सना आणखी एक धक्का दिला आहे. खरं तर, कंपनीने आपल्या दोन दीर्घकालीन प्रीपेड प्लॅनचे बेनिफिट्स कमी केले आहेत. VI ने 666 आणि 479 रुपयांच्या दोन प्रीपेड प्लॅनची वैधता कमी केली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, आता VI ने 479 रुपयांच्या प्लॅनची वैधता 8 दिवसांनी कमी केली आहे. त्याबरोबरच, कंपनीने 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 13 दिवसांची कपात केली आहे. मात्र, या प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या प्लॅनची नवी वैधता आणि बेनिफिट्स-
Vodafone Idea च्या Rs 479 च्या प्लॅनची वैधता आधी 56 दिवसांची होती. मात्र, आता या प्लॅनमध्ये केवळ 48 दिवसांची सेवा वैधता मिळणार आहे. लक्षात घ्या की, कंपनीने केवळ या प्लॅनची वैधता कमी केली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले इतर सर्व फायदे पूर्वीप्रमाणेच आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100SMS दिले जातात. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.
Vodafone Idea चा 666 रुपयांचा प्लॅन आता 64 दिवसांच्या वैधतेसह येईल. मात्र, याआधी या प्लॅनची वैधता तब्बल 77 दिवसांपर्यंत होती. म्हणजेच, आता हा प्लॅन एकूण 13 दिवस कमी चालेल. वरील प्लॅनप्रमाणे, या प्लॅनमध्ये देखील उपलब्ध फायदे पूर्वीप्रमाणेच आहेत. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS चा लाभ मिळेल.
लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये उपलब्ध दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये Vi Hero Unlimited फायदे देखील मिळतात. या बेनिफिट्समध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट आणि बिंज ऑल नाईट सारखे बेनिफिट्स दिले जातात.