Vodafone Idea चा जबरदस्त प्लॅन! 84 दिवसांच्या वैधतेसह भरपूर डेटा आणि Unlimited बेनिफिट्स, किंमतही कमी

Vodafone Idea चा जबरदस्त प्लॅन! 84 दिवसांच्या वैधतेसह भरपूर डेटा आणि Unlimited बेनिफिट्स, किंमतही कमी
HIGHLIGHTS

लॉन्ग टर्म प्लॅन्समध्ये VI कंपनी एक अप्रतिम प्लॅन ऑफर करते.

VI चा 459 रुपयांचा प्लॅन जवळपास तीन महिन्यांच्या वैधतेसह येतो.

अमर्यादित कॉलिंगसह कंपनी या प्लॅनमध्ये 1000SMS मोफत देत आहे.

Vodafone Idea च्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्लॅन्स डेटा आधारित आणि लॉन्ग टर्म व्हॅलिडिटीसह येतात. लॉन्ग टर्म प्लॅन्समध्ये VI कंपनी एक अप्रतिम प्लॅन ऑफर करते, जो सुमारे 3 महिन्यांच्या वैधतेसह येतो. विशेष म्हणजे या प्लॅनची किमंतही अगदी किफायशीर आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: Redmi Note 13 सीरीजच्या भारतीय लाँच डेटची घोषणा, 200MP कॅमेरासह ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल। Tech News

Vodafone Idea चा 459 रुपयांचा प्लॅन

होय, कथित VI प्लॅनची किंमत 459 रुपये इतकी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा प्लॅन 84 दिवस रिचार्जच्या तणावापासून मुक्ती देते. प्लॅनमध्ये कंपनी डेटासोबत कॉलिंग आणि फ्री SMSचा लाभ देखील मिळणार आहे. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या रिटेलरकडून ऍक्टिव्ह केला जाऊ शकतो.

vodafone idea 459rs plan
vodafone idea

सविस्तर बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजरला 6GB डेटा मिळतो. कंपनीने गरजेनुसार डेटा वापरण्याची सुविधा दिली आहे. डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेट फक्त डेटा बूस्टर प्लॅनसह रीस्टार्ट केले जाऊ शकते. लक्षात घ्या की, डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट थांबत नाही, परंतु कंपनी प्रति MB 50 पैसे आकारते. एवढेच नाही तर, हा एक अमर्यादित कॉलिंग प्लॅन आहे, ज्यामध्ये स्थानिक आणि STD कॉल्सचा लाभ मिळतो. त्याबरोबरच, कंपनी या प्लॅनसह 1000SMS मोफत देत आहे, हा एक आश्चर्यकारक फायदा प्लॅनसोबत ऑफर केला जातो.

विशेष म्हणजे यात वापरकर्त्याला Vi Movies & TV ऍप्सचा ऍक्सेस मिळतो, ज्यामध्ये तुम्ही 5000 हून अधिक चित्रपट, टीव्ही शोसह 200 हून अधिक टीव्ही चॅनेल पाहू शकता. या प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo