Vodafone Idea Plans: वापरकर्त्यांची तर मज्जाच मजा! 2 पॉप्युलर प्लॅन्स झाले अपग्रेड,15 OTT ऍक्सेस मिळेल Free

Updated on 08-Oct-2024
HIGHLIGHTS

VI ने ग्राहकांसाठी विद्यमान 2 प्रीपेड प्लॅन्स अपग्रेड केले आहेत.

VI ने 449 रुपये आणि 979 रुपयांचे प्लॅन्स अपग्रेड केले आहेत.

आता VI ने या प्लॅनसह तुमच्या मनोरंजनाची देखील व्यवस्था केली आहे.

Vodafone Idea (VI) आपल्या नवनवीन प्लॅन्स आणि ऑफर्सद्वारे युजर्सना खुश करत असते. मात्र, आता VI ने ग्राहकांसाठी विद्यमान 2 प्रीपेड प्लॅन्स अपग्रेड केले आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला आता 15 OTT मध्ये पूर्णपणे मोफत ऍक्सेस मिळेल. लक्षात घ्या की, पूर्वी या प्लॅन्समध्ये कोणतेही OTT लाभ नव्हते. परंतु, आता कंपनीने या प्लॅनसह तुमच्या मनोरंजनाची देखील व्यवस्था केली आहे. कथित प्लॅन्स कंपनीचे हे VI Hero Unlimited प्लॅन्स आहेत. जाणून घेऊयात या Vodafone Idea प्लॅन्सची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

Vodafone Idea Hero Unlimited Plans

Vodafone Idea ने आपले 2 विद्यमान Vodafone Idea Hero Unlimited प्लॅन्स अपग्रेड केले आहेत. या प्लॅनची ​​किंमत 449 रुपये आणि 979 रुपये इतकी आहे. आता हे दोन Vi Hero Unlimited प्लॅन तुम्हाला OTT बेनिफिट्स देखील देणार आहेत. या प्लॅन्ससह कंपनी आता मोफत Vi Movies आणि TV Super Pack बेनिफिट देत आहे. Vi Movies आणि TV Super Pack च्या बेनिफिट्समध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 15 पेक्षा जास्त OTT ऍप्सचे ऍक्सेस मिळणार आहे.

Vi Movies आणि TV Super Pack बेनिफिट्सबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, या पॅकची किंमत 175 रुपये इतकी आहे. या पॅकमध्ये तुम्हाला SonyLIV, ZEE5, ManoramaMAX, FanCode, PlayFlix इ. 15 OTT प्लॅटफॉर्मवर मोफत ऍक्सेस मिळणार आहे. हा प्लॅन युजरला 10GB डेटा सुद्धा देतो.

Vodafone Idea चा 449 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या 449 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमधील फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटाचा लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळणार आहे.

Vodafone Idea चा 979 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या 979 रुपयांचा प्लॅन जवळपास तीन महिने म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटाचा लाभ मिळणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणि दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळेल. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :