Vodafone Idea (Vi) कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक आकर्षक प्लॅन्स लाँच करत असते. या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना अनेक अतिरिक्त फायदे दिले जातात. जर तुम्ही सर्वात कमी किमतीत दीर्घ वैधता असलेले प्लॅन्स शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Vodafone Idea च्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, जजो लॉन्ग टर्म प्लॅन आहे.
या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Vodafone Idea (Vi) च्या 329 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात या प्लॅनचे फायदे-
Vodafone Idea चा 329 रुपयांचा रिचार्ज प्लॅनमध्ये 4GB डेटासह येतो. हा 4GB डेटा तुम्ही 56 दिवस कधीही वापरू शकता. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. तसेच, या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 600 फ्री SMS ची सुविधा मिळेल. VI चा हा प्लॅन अशा लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल जे डेटापेक्षा जास्त वैधता असलेला प्लॅन्स शोधत आहेत.
हा प्लॅन वापरकर्त्यांना कमी किंमतीत दीर्घ वैधता देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्या घरात Wi-Fi सुविधा असेल आणि तुम्हाला केवळ बाहेर गेल्यास पुरेशा डेटाची गरज असेल तर हा प्लॅनतुमच्यासाठी अगदी योग्य ठरणार आहे. एवढेच नाही तर, कमी किमतीच्या रिचार्जमध्ये तुमचा हा नंबर 56 दिवस सक्रिय राहील. तसेच संपूर्ण वैधतेदरम्यान कॉलिंग आणि SMS सुविधा देखील मिळेल.
लक्षात घ्या की, इतर टेलिकॉम कंपन्यांकडे देखील या किंमत श्रेणीमध्ये अप्रतिम प्लॅन्स उपलब्ध आहेत. Jio कंपनीने 328 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. तर, Airtel कंपनीचा 1 महिन्याच्या वैधतेसह येणारा प्लॅन 319 रुपयांमध्ये येतो.