Vodafone Idea चा अनोखा प्रीपेड प्लॅन लाँच, तब्बल 13 OTT Apps चे सबस्क्रिप्शन मिळेल Free। Tech News 

Vodafone Idea चा अनोखा प्रीपेड प्लॅन लाँच, तब्बल 13 OTT Apps चे सबस्क्रिप्शन मिळेल Free। Tech News 
HIGHLIGHTS

Vodafone Idea चा नवा Entertainment रिचार्ज प्लॅन लाँच

VI च्या या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 202 रुपये आहे.

OTT प्लॅटफॉर्ममध्ये Disney + Hotstar, Sony Liv आणि SunNXT सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मचा समावेश

भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea आपल्या अप्रतिम प्लॅन्समुळे रोज चर्चेत असते. कंपनी आपल्या स्वस्त प्लॅन्समध्ये अनेक विशेष बेनिफिट्स ऑफर करते. दरम्यान, कंपनीने आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या नव्या प्लॅनसह एक दोन नव्हे तर, अनेक लोकप्रिय OTT Apps चे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.

हा VI चा एक बजेट फ्रेंडली प्लॅन आहे. Vodafone idea च्या या नव्या बजेट फ्रेंडली प्लॅनची किमंत केवळ 202 रूपये इतकी आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या प्लॅनमध्ये मिळणारे आकर्षक बेनिफिट्स-

Vodafone Idea Prepaid Plans

Vodafone Idea 202 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 202 रुपये आहे. 202 रुपयांचा हा प्लॅन पुरेशा वैधतेसह म्हणेजच संपूर्ण 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये सामान्य रिचार्ज प्लॅनसारखे बेनिफिट्स देण्यात येणार नाही. होय, या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि SMS शी संबंधित फायदे मिळणार नाहीत.

तर VI कडून 202 रुपयांचा ‘Entertainment रिचार्ज प्लॅन’ आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना 1 महिन्याचे Vi Movies & TV Pro ची मेंबरशिप ऑफर करते. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 13 पेक्षा जास्त OTT प्लॅनचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळेल. लक्षात घ्या की, या OTT प्लॅटफॉर्ममध्ये Disney + Hotstar, Sony Liv आणि SunNXT सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

OTT banner

वर सांगितल्याप्रमाणे, हा VI चा एंटरटेनमेंट रिचार्ज प्लॅनची होय. त्यामुळे, तुम्हाला इतर सामान्य टेलिकॉम फायद्यांसाठी वेगळ्या बेस प्लॅनची ​​आवश्यकता आहे. या बेस प्लॅन अंतर्गत तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, डेटा आणि SMS ची सुविधा मिळणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo