Vodafone-Idea ने गुपचूपपणे आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन प्लॅन सामील केला आहे. ज्या यूजर्सना रोज अतिरिक्त डेटाची आवश्यकता असते, हा प्लॅन त्या वापरकर्त्यांसाठी आवश्यक आहे. म्हणजेच, हा कंपनीचा नवा डेटा वाउचर आहे. हे वाऊचर युजर्सना डेली डेटा प्रोव्हाइड करणारा प्लॅन आहे. मात्र, हा प्लॅन युजर्सना केवळ डेटा ऍक्सेसच देणार आहे. चला तर मग, या प्लॅनबद्दल सविस्तर तपशील जाणून घेऊयात-
Vodafone Idea च्या न्य डेटा वाऊचरची किमंत 181 रुपये आहे. हा वाऊचर तीन दिवसांच्या वैधतेसह येतो. हा डेटा वाऊचर युजर्सना दररोज 1GB डेटा ऑफर करतो. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे हा प्लॅन फक्त डेटा प्रोव्हाइड करतो, कॉलिंग आणि SMSचे बेनिफिट्स यात तुम्हाला मिळणार नाहीत. कॉलिंग आणि SMS साठी तुम्हाला वेगळा बेस प्लॅन ऍक्टिव्हेट करावा लागेल.
VI प्रमाणे AIRTELकडे ही 181 रुपयांचा डेली डेटा व्हाउचर प्लॅन आहे. कंपनीचा हा प्लॅन वरील प्लॅनप्रमाणेच बेनिफिट्स देतो. हा डेटा वाऊचर तीस दिवसांच्या वैधतेसह युजर्सना दररोज 1GB डेटा ऑफर करतो.
कंपनीच्या नव्या डेटा वाऊचरमध्ये कॉलिंग आणि SMS चे लाभ घेण्यासाठी तुम्हाला 195 रुपयांचा प्लॅन ऍक्टिव्ह करावा लागेल. या प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह 2GB डेटा आणि 300 SMS मिळतील. या प्लॅनची वैधता 31 दिवसांची आहे.