अलीकडेच रिलायन्स Jio, भारती Airtel आणि Vodafone Idea ने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. दरवाढीसह कंपनीने काही प्लॅन्समध्ये मोफत OTT सबस्क्रिप्शन दिले जात होते, त्यामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, सर्वात स्वस्त मोफत Netflix पण आता VI कडून ऑफर केला जात आहे. होय, तुम्हाला देखील Netflix चे सबस्क्रिप्शन मोफत हवे असेल तर, VI कडे अप्रतिम प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनसह VI ने Jio ला देखील मागे टाकले आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea (VI) द्वारे मोफत Netflix फक्त एकाच प्लॅनमध्ये ऑफर केले जात आहे कंपनीच्या या प्लॅनची किंमत 1,198 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन एकूण 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 2GB दैनिक डेटा देखील उपलब्ध आहे. यासह तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळत आहे. OTT बद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Netflix बेसिक सब्सक्रिप्शन 70 दिवसांसाठी ऑफर केले जात आहे.
Jio चा 1799 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा ऑफर केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या रिचार्जमध्ये फ्री कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100 SMSचा लाभ देखील मिळेल. OTT बेनिफिट्समध्ये हा प्लॅन Netflix Basic चे सबस्क्रिप्शनसह येतो.
Jio चा 1,299 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. हा प्लॅनसुद्धा वरील प्लॅनप्रमाणे 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100SMS चा लाभ देखील मिळेल. OTT बेनिफिट्समध्ये Netflix मोबाईल सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.