Vodafone Idea ने घातला धुमाकूळ! केवळ 1 रुपयाचा प्लॅन केला लाँच, बेनिफिट्स ऐकून बसेल धक्का। Tech News 

Vodafone Idea ने घातला धुमाकूळ! केवळ 1 रुपयाचा प्लॅन केला लाँच, बेनिफिट्स ऐकून बसेल धक्का। Tech News 
HIGHLIGHTS

Vodafone Idea ने लाँच केला टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात स्वस्त प्लॅन

VI कंपनीने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओ अंतर्गत 1 रुपयाचा प्लॅन लाँच केला.

Vodafone Idea च्या या प्लॅनची ​​वैधता देखील 1 दिवसाची आहे.

प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea VI ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी VI सतत अनोख्या आणि आकर्षक बेनिफिट्ससह प्लॅन्स लाँच करत असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आता VI ने आपल्या वापरकर्त्यांसाठी भारतीय दूरसंचार क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची ​​किंमत फक्त ‘1 रुपये’ इतकी आहे.

होय, VI चा 1 रुपयांचा प्लॅन पाहून देशातील इतर प्रतिस्पर्धी Airtel-Jio सारख्या कंपन्यांची चिंता वाढू शकते. चला तर मग जास्त वेळ न घालवता, Vi च्या 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतील ते येथे जाणून घ्या.

Vodafone Idea च्या 1 रुपयाच्या प्लॅनचे बेनिफिट्स

टेलिकॉम दिग्ग्ज VI कंपनीने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओ अंतर्गत 1 रुपयाचा प्लॅन लाँच केला आहे. Vodafone Idea च्या या प्लॅनची ​​वैधता देखील 1 दिवसापर्यंत मिळेल. या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झल्यास, यात तुम्हाला 75 पैशांचा टॉकटाइम दिला जातो, जो 1 दिवसापर्यंत वैध आहे. लक्षात घ्या की, कॉलिंग व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये SMS आणि डेटा फायदे दिले जात नाही.

Vodafone Idea Vi 1 rs Plan
Vodafone Idea Vi 1 RS Plan

एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये 1 ऑन-नेट नाईट मिनिट्स देखील उपलब्ध आहेत. ही मिनिटे तुम्हाला रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय इतर VI नंबरवर कॉल करण्याची परवानगी देतात.

आपणा सर्वांना माहितीच आहे की, VI चा हा प्लॅन प्रत्येक ग्राहक वापरणार नाही. मात्र, हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी महत्त्वाचा असेल, जे लिमिटेड टॉकटाईमसह येणाऱ्या प्लॅनचे रिचार्ज करतात. होय, जे युजर्स 99, 198 आणि 204 रुपयांचे रिचार्ज प्लॅन ऍक्टिव्ह करतात. हे तिन्ही प्लॅन्स मर्यादित टॉक टाइमसह येतात. जर या युजर्सची टॉकटाइम कोटा संपला तर, ते एमर्जन्सी 1 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकतात. जेणेकरून 75 पैशांचा टॉकटाइम वापरला जाईल आणि युजर्स मिस्ड कॉल करून त्यांचे काम करू शकतात. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत साईटला भेट द्या.

इतर कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन

सांगितल्याप्रमाणे, VI चा एक रुपयाचा प्लॅन टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात स्वस्त प्लॅन आहे. Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन 10 रुपयांचा आहे, ज्यामध्ये यूजर्सना 7.47 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. तर दुसरीकडे, Jio चा 10 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये यूजर्सना 7.47 रुपयांचा टॉकटाइम उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo