Airtel ने आपल्या या पोस्टपेड प्लान मध्ये केले मोठे बदल, आता 120GB डेटा मिळेल तुम्हाला

Airtel ने आपल्या या पोस्टपेड प्लान मध्ये केले मोठे बदल, आता 120GB डेटा मिळेल तुम्हाला
HIGHLIGHTS

Airtel ने आपल्या Rs 1,199 वाल्या पोस्टपेड प्लान मध्ये मोठा बदल करत 90GB डेटा वाढवून 120GB केला आहे. याचा अर्थ असा की आता तुम्हाला या प्लान मध्ये 30GB डाटा अतिरिक्त मिळत आहे.

Vodafone effect Airtel Revised its RS 1199 Postpaid Plan with Nw Data Benefit: वोडाफोन ने काही दिवसांपूर्वी आपल्या RED Postpaid प्लान ची डेटा लिमिट जवळपास 87 टक्क्यांनी वाढवली आहे. आणि आता एयरटेल ने पण आपल्या काही प्लान्स मध्ये बदल केले आहेत, पण यात काही लिमिटेड प्लान्स आहेत. त्यात आता एयरटेल ने एक मोठे पाऊल टाकत आपल्या Rs 1,199 रुपयांच्या प्लान मध्ये मिळणारा डेटा लाभ वाढवला आहे.

या प्लान बद्दल बोलायाचे तर हा Rs 1,199 मध्ये येतो आणि यात अनलिमिटेड कॉलिंग मग ती लोकल असो वा नॅशनल, त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड रोमिंग पण मिळत आहे. सोबतच SMS संबधी पण या प्लान मध्ये कोणतीही लिमिट नाही. तसेच या प्लान मध्ये एक वर्षाचे कॉम्प्लीमेंट्री अमेजॉन प्राइम सब्सक्रिप्शन मिळत आहे. सोबतच तुम्हाला या प्लान मध्ये विंक म्यूजिक आणि एयरटेल टीवी चा एक्सेस पण मिळत आहे. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला हँडसेट प्रोटेक्शन पण मिळत आहे. 

या प्लान मध्ये मिळणारे नवीन फायदे पाहता यात डेटा व्यतिरिक्त इतर फायदे जसेच्या तसे आहेत. या प्लान मध्ये आता पर्यंत तुम्हाला 90GB 3G/4G डेटा मिळत होता, पण आता या प्लान मध्ये तुम्हाला 120GB डेटा दिला जात आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला या प्लान मध्ये 30 GB डेटा नवीन बदल म्हणून दिला जात आहे. 
या प्लान ची तुलना Vodafone च्या Rs 1,299 मध्ये येणार्‍या प्लान सोबत केल्यास, या प्लान मध्ये पण तुम्हाला एयरटेल च्या प्लान सारखेच मिळत आहेत, म्हणजे डेटा व्यतिरिक्त इतर लाभ जसेच्या तसे आहेत. पण यात तुम्हाला वोडाफोन प्ले चा एक्सेस मिळत आहे, त्याचबरोबर मोबाइल डाटा प्रोटेक्शन प्लान पण तुम्हाला या प्लान मध्ये मिळत आहे. 

वोडाफोन च्या या प्लान मध्ये तुम्हाला अमेजॉन प्राइम चे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन तुम्हाला मिळेल, सोबत काॅम्प्लेमेंट्री नेटफ्लिक्स चे सब्सक्रिप्शन पण 2 महिन्यासाठी मिळेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo