वोडाफोनने लाँच केले नवीन प्लान्स, ज्यात मिळतेय अनलिमिटेड रोमिंग आणि कॉलिंग

Updated on 19-Aug-2016
HIGHLIGHTS

वोडाफोनने एंट्री लेवल वोडाफोन रेड पोस्टपेड प्लान्ससुद्धा लाँच केले. ज्याची किमत ४९९ रुपये, ६९९ रुपये आणि ९९९ रुपये आहे. ह्यात आपल्याला आकर्षक टॉकटाईम सह डबल डेटा लाभ सुद्धा मिळत आहे.

वोडाफोन रेडच्या अंतर्गत वोडाफोनने काही नवीन प्लान्स लाँच केेले आहे. हे नवीन ६ प्लान्समधील २ प्लान्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह रोमिंगसुद्धा मिळत आहे. हा जवळपास 8GB पर्यंत डाटा आहे.

वोडाफोन रेड एक ऑल इन वन पोस्टपेड प्लान आहे, ज्यात हाय व्हॅल्यू पोस्टपेड ग्राहकांसाठी बनवला आहे. त्याचबरोबर हे प्लान्स त्यांना जास्त सूट करतात, जे आपल्या स्मार्टफोन्सचा जास्तीत जास्त वापर करतात, इंटरनेट प्लान्सचा जास्त वापर करतात.  

हे जे दोन प्लान आहेत, ह्यात अनलिमिटेड कॉलिंगसह रोमिंगचाही समावेश आहे आणि ह्याची किंमत १,९९९ रुपये आणि १,६९९ रुपये आहे. ह्या प्लानमध्ये 8GB पर्यंत डाटा मिळत आहे. वोडाफोननुसार, ह्या किंमतीत आपल्याला केवळ 6GB चा डाटा मिळत आहे. त्याचबरोबर ह्या दोन्ही प्लान्समध्ये 500 SMS मिळत आहे.

हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक

साथही वोडाफोनने एंट्री लेवल वोडाफोन रेड पोस्टपेड प्लान्ससुद्धा लाँच केले. ज्याची किमत ४९९ रुपये, ६९९ रुपये आणि ९९९ रुपये आहे. ह्यात आपल्याला आकर्षक टॉकटाईम सह डबल डेटा लाभ सुद्धा मिळत आहे.

हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…

ह्याआधी वोडाफोनने फ्रेंडशिप दिनाचे औचित्य साधून बॅक टू कॅम्पस अभियान चालवले होते. हे अभियान देशात जवळपास ४०० पेक्षा जास्त कॉलेजात चालवले गेले होते.

 

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :