दूरसंचार कंपनी व्हिडियोकॉनने मोबाईल इंटरनेट व्यवसाय वाढवण्यासाठी आपली ‘डबल डेटा’ योजना सुरु केली आहे. ह्या ‘डबल डेटा’ ऑफरअंतर्गत दूरसंचार कंपनी व्हिडियोकॉनने आपल्या सर्व योजनांमध्ये मोबाईल इंटरनेटचा वापर दुप्पट केला आहे.
कंपनीने ह्या विषयी विधान केले आहे की, व्हिडियोकॉन टेलिकॉमनुसार त्याने ‘डबल डेटा’ योजना सुरु केली आहे. त्याच्या अंतर्गत ग्राहक आपल्याद्वारे घेतलेला पॅक त्याच क्षमतेने रात्रीसुद्धा नि:शुल्क वापरु शकतील. उदाहरणार्थ जर कंपनीच्या कोणत्या ग्राहकाने 1GB डेटा खरेदी केला आहे तर तो रात्री 1GB अतिरिक्त डेटा (मध्यरात्रीपासून सकाळी ७ पर्यंत) वापरु शकतो.
कंपनीच्या ह्या घोषणेमुळे व्हिडियोकॉनच्या त्या ग्राहकांना फायदा होईल, जो खूप जास्त इंटरनेटचा वापर करतो. लोक जास्त करुन व्हाट्स अॅप, फेसबुक आणि गुगल सारख्या साइट्सचा जास्त उपयोग करु शकतात.
मोबाईल इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता व्हिडियोकॉनने आणलेली ही ऑफर नक्कीच फायदेशीर ठरेल असे म्हटल तर काही वावगं ठरणार नाही.