VI vs BSNL 1,999 Rs Plan : कोणती कंपनी देतेय तुम्हाला सर्वोत्तम बेनिफिट्स? कुणाचा प्लॅन पडतोय भारी?
Vodafone Idea आणि BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या प्लॅनमध्ये जास्त वैधता आणि OTT सब्स्क्रिप्शनची सुविधा
VI चा प्लॅन संपूर्ण 250 दिवसांच्या वैधतेसह येतो.
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आणि देशातील तिसरी टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea दोन्ही 1,999 रुपयांचा प्लॅन ऑफर करतात. हा प्लॅन कंपन्यांचा दीर्घकालीन वैधतेसह येणारा प्लॅन आहे. किंमत जरी समान असली तरी दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स वेगळे आहेत. आपण जर बेनिफिट्स बघितले तर, BSNL चा प्लॅन VI पेक्षा उत्तम ठरू शकतो. बघुयात दोन्ही प्लॅन्सचे फायदे-
Vodafone Idea चा 1,999 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या नुकत्याच लाँच झालेल्या प्लॅनची किंमत 1,999 रुपये आहे. यासह संपूर्ण 250 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यामध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा मिळतो. 250 दिवसांच्या वैधतेनुसार तुम्हाला एकूण 375GB डेटा मिळेल. तसेच, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMSचे लाभ देखील आहेत.
BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची वैधता मिळते. प्लॅनमध्ये 600GB डेटा मिळेल. मर्यादा संपल्यास इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. त्याबरोबरच, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा उपलब्ध आहे.
विशेषतः BSNL चा प्लॅन OTT बेनिफिट्ससह येतो. या रिचार्जसह तुम्हाला EROS NOW Entertainment चे 30 दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
जर आपण दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट बघितले तर BSNL च्या प्लॅनमध्ये जास्त वैधता आणि OTT सब्स्क्रिप्शनची सुविधा आहे. तर VI च्या प्लॅनमध्ये कोणतेही OTT लाभ नाहीत आणि वैधता देखील कमी आहे. मात्र, प्लॅन निवडण्याआधी तुम्हाला तुमच्या क्षेत्रात कोणत्या कंपनीचे नेटवर्क चांगले आहे, ते बघावे लागेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile